शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

आमदारांच्या विनंतीनंतर तलाठ्यांचे आंदोलन मागे

By admin | Published: June 14, 2016 12:46 AM

आमदार देवराव होळी यांनी तलाठ्याला अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप करीत या प्रकरणी आमदारांवर कारवाई करावी,

तक्रारी मागे घेतल्या : आमदारांनी आंदोलनस्थळाला प्रत्यक्ष दिली भेटगडचिरोली : आमदार देवराव होळी यांनी तलाठ्याला अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप करीत या प्रकरणी आमदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाभरातील तलाठ्यांनी ६ जूनपासून आंदोलनाला सुरूवात केली होती. दरम्यान, आ. होळी यांनी १३ जून रोजी दुपारी ४ वाजता गडचिरोली येथील तलाठ्यांच्या आंदोलन स्थळाला भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर तलाठ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्याचबरोबर एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीसुध्दा मागे घेतल्या. कठाणी नदीवरील रेती घाटावरून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांविरोधात उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या नेतृत्वात तलाठ्यांनी कारवाई केली होती. याचदरम्यान आमदार डॉ. देवराव होळी हे सुध्दा त्या ठिकाणी पोहोचले होते. आमदार व तलाठी यांच्यामध्ये बाचाबाची होऊन त्यांनी एकमेकांविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. जिल्हाभरातील तलाठ्यांनी ६ जूनपासून लेखणी बंद आंदोलन व १० जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. शेतीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध दाखले तलाठ्यांकडून मागावे लागतात. अशातच तलाठ्यांनी आंदोलन सुरू केल्याने सामान्य जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील मंडळ अधिकारी कार्यालयासमोरील तलाठ्यांच्या धरणे आंदोलनाला सोमवारी भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना आपल्या दोघांच्या भांडणामुळे जनतेचे हाल होत आहेत. हे योग्य नसून विकासाला मारक ठरणारे आहे. त्यामुळे तलाठ्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. त्यानंतर तलाठ्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. तक्रारकर्ते तलाठी अजय तुंकलवार व आमदार डॉ. देवराव होळी या दोघांनीही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकमेकांच्याविरोधातील तक्रारी मागे घेतल्या. आंदोलन स्थळाला आमदारांनी भेट दिली. यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अनिल पोहोणकर, विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष के. पी. ठाकरे, उपाध्यक्ष पी. टी. तुलावी, सहसचिव व्ही. व्ही. बोंडे, एन. जी. वाते, मंडळ अधिकारी प्रकाश डांगे, बी. ए. बांबोळे, विलास बारसागडे, महेश गेडाम, अजय तुंकलवार, गणेश खांडरे यांच्यासह तालुक्यातील तलाठी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)तलाठ्यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी मध्यस्ती केली होती. राज्यात आपलेच सरकार आहे. आंदोलनामुळे सामान्य जनतेचे हाल होऊ नयेत, ही बाब लक्षात घेऊन आपण प्रत्यक्ष आंदोलनस्थळाला भेट दिली व तलाठ्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.- डॉ. देवराव होळी, आमदार गडचिरोली