शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
2
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
3
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
5
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
6
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
7
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
8
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
10
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
11
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
12
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
13
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
14
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
15
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
16
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
17
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
18
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
19
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
20
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!

तब्बल दोन महिन्यानंतर पालकमंत्री पोहोचले तुमरगुंडात

By admin | Published: March 20, 2016 1:09 AM

तालुक्यातील तुमरगुंडा येथील रहिवासी तोंदे पोटावी यांचा १० वर्षीय मुलगा संदीप याचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे.

पोटावी कुटुंबीयांचे केले सांत्वन : आर्थिक मदतही दिलीएटापल्ली : तालुक्यातील तुमरगुंडा येथील रहिवासी तोंदे पोटावी यांचा १० वर्षीय मुलगा संदीप याचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. संदीप पोटावी याने १३ जानेवारी २०१६ रोजी रात्री शेवटचा श्वास घेतला. अहेरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम तब्बल दोन महिन्यानंतर तुमरगुंडा येथे शनिवारी पोहोचले. त्यांनी पोटावी कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले.पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम अचानक तुमरगुंडा गावात पोहोचल्यानंतर सर्व ग्रामस्थ आश्चर्यचकीत झाले. भेटीदरम्यान पालकमंत्री आत्राम यांनी संदीपचे वडील तोंदे पोटावी यांच्याशी चर्चा करून त्यांना आर्थिक मदत दिली. एटापल्लीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या तुमरगुंडा येथील संदीप पोटावी हा मुलगा १७ नोव्हेंबर रोजी आजारी पडला. दरम्यान एटापल्लीच्या खासगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. संदीपच्या रक्त नमुन्याची तपासणी करण्यात आली. तपासणी रिपोर्टमध्ये ब्रेन मलेरियाचे लक्षण आढळून आले. त्यानंतर संदीपच्या कुटुंबीयांनी हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुजाऱ्यांकडे नेऊन संदीपवर उपचार केला. त्यानंतर १२ जानेवारी रोजी संदीपची प्रकृती अचानक ढासळली. त्याच रात्री संदीपचे वडील तोंदे पोटावी रात्री १०.३० वाजता एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात संदीपला दाखल केले. १३ जानेवारी रोजी सायंकाळला संदीपचा मृत्यू झाला. रूग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर संदीप जीवंत होता. मात्र त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. वडील तोंदे पोटावी आपल्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाताना त्याची कोणीही मदत केली नव्हती. (शहर प्रतिनिधी)