शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

दोन वर्षांनंतर महाशिवरात्रीसाठी यावर्षी शिवालये गजबजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 5:57 PM

मार्कंडासह अनेक ठिकाणी जत्रा, विशेष बसफेऱ्यांचेही नियोजन; गर्दी टाळण्याचे आवाहन

गडचिरोली : जिल्ह्यात विविध ठिकाणी असणारी शिवमंदिरे शनिवारी (दि.१८) महाशिवरात्रीनिमित्त गजबजणार आहेत. कोरोनाकाळातील दोन वर्ष जत्रा भरविण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे यावर्षी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता पाहता प्रशासनाने सर्व प्रकारची व्यवस्था ठेवण्याचे नियोजन केले आहे. प्रसिद्ध मार्कंडा देवस्थानाबरोबरच इतरही ठिकाणी महाशिवरात्रीची जत्रा भरणार आहे. यावेळी भाविकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यात्रेच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी संजय मीना यांनी विविध विभागांच्या नियोजन बैठका घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. यावर्षी प्रशासनाकडून मार्कंडा देवस्थानासह आरततोंडी (कुरखेडा), डोंगरी (आरमोरी), चपराळा (चामोर्शी), वैरागड, पळसगाव (आरमोरी), वांगेपल्ली, वेंकटापूर (अहेरी) व सोमनूर (सिरोंचा) या ठिकाणी भाविकांसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी सूचनाफलक, दिशादर्शक फलक तयार केले आहेत. भाविकांनी सूचनांचे पालनही करणे अपेक्षित आहे.

बोटमधून प्रवास करताना खबरदारी घ्या

भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून समग्र प्रवेश मार्ग व निर्गमन मार्ग आखून घेण्यात आले आहेत. काही ठिकाणी भाविक नदीतील बोट वापरून प्रवास करतात. यावेळी प्रवासाकरिता सुरक्षित मार्ग आखून दिला असेल तरच त्या ठिकाणी प्रवास करावा, अन्यथा पाण्यातून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

स्नान करताना विशेष काळजी घ्या

यात्रेसाठी येणारे भाविक दर्शनाआधी नदीपात्रात किंवा शेजारील उपलब्ध पाण्यात स्नान करून देवदर्शन घेतात. यावेळी प्रशासनाकडून नियोजित केलेल्या ठिकाणीच स्नान करावे. लावलेल्या बॅरिकेड्सच्या बाहेर जाऊन किंवा इतरत्र स्नान करणे जीविताला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भाविकांनी कुठल्याहीप्रकारे सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.

प्रशिक्षित ३०० आपत्ती मित्र करणार मदत

जिल्हा आपत्ती प्राधिकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडक ३०० युवक-युवतींना आपत्ती व्यवस्थापनाबत प्रशिक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान हे आपत्ती मित्र प्रशासनाला सहकार्य करून व्यवस्था राखण्याबाबत भाविकांना मदत करणार आहेत.

गडचिराेलीवरून मार्कंडासाठी ७० रुपये तिकीट

महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या चामाेर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील जत्रेला सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून गडचिराेली, चामाेर्शीवरून बसेस साेडल्या जाणार आहेत. गडचिराेली ते मार्कंडासाठी ७० रुपये व चामाेर्शी ते मार्कंडासाठी २० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. ३० ते ३५ प्रवासी मिळताच बस साेडली जाणार आहे. गडचिराेलीवरून सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील. तसेच मार्कंडावरून रात्री १० वाजता शेवटची बस गडचिराेलीसाठी साेडली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, व्याहाड येथूनही बस साेडली जाणार आहे, अशी माहिती गडचिराेली बस आगाराचे व्यवस्थापक फाल्गुन राखडे यांनी दिली.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीGadchiroliगडचिरोली