बाॅक्स
साठा करणाऱ्या दुकानदारांचे नुकसान
खाद्यतेलाच्या किमती वाढत असल्याने त्यातून अधिकाधिक फायदा घेण्यासाठी काही दुकानदारांनी खाद्यतेलाची साठवणूक करून ठेवली. तसेच काही व्यापाऱ्यांनी वाढीव दराने पहिलेच तेल बुकिंग करून ठेवले. आता मात्र भाव कमी हाेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अधिकच्या दराने खरेदी केलेले खाद्यतेल कमी किमतीने विकावे लागत आहे. त्यामुळे दुकानदारांना ताेट्याचा सामना करावा लागत आहे.
काेट
शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल
२० वर्षांपूर्वी शेतात जवसाचे उत्पादन घेतले जात हाेते. कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे जवसाचे तेल चक्कीवर काढले जात हाेते. उर्वरित जवस विकले जात हाेते. जवसाच्या शेतीची जागा साेयाबीनने घेतली. तेव्हापासून दुकानातून खरेदी केलेले तेल खावे लागत आहे. आता तर साेयाबीनच्या ऐवजी कापसाची लागवड केली जात आहे.
- पुंजीराम डाेईजड, शेतकरी
काही शेतकऱ्यांनी साेयाबीनची लागवड करायला सुरुवात केली हाेती. मात्र, भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कापूस पिकाकडे वळला. विदेशातून तेल आयात करण्यापेक्षा शासनाने तेलबिया वर्गीय पिकांना चालना देण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकचा भाव द्यावा लागेल.
- आत्माराम धाेटे, शेतकरी
खाद्यतेलाचे दर (प्रती किलो)
आधीचे आताचे
सूर्यफूल १९० १६०
सोयाबीन १६० १३५
शेंगदाणा १९० १७०
पाम १५० १३०
सरसू २२० १८०