एकूण बाधितांची संख्या ११ हजार ८३१ एवढी झाली आहे. त्यापैकी १० हजार ५१३ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्ध्या १ हजार १९३ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण १२५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील भूज येथील ७३ वर्षीय महिलेचा काेराेनामुळे मृत्यू झाला.
नवीन २२९ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ११६, अहेरी ११, आरमोरी १७, भामरागड १७, चामोर्शी १५, धानोरा ५, एटापल्ली ९, कोरची ११, कुरखेडा १३, मुलचेरा ३, सिरोंचा १ तर देसाईगंज तालुक्यातील ११ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ७१ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १९, अहेरी ११, आरमोरी ७, भामरागड ११, चामोर्शी ३, धानोरा २, एटापल्ली २, कोरची १, कुरखेडा १, तसेच देसाईगंज तालुक्यातील १५ जणांचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील ६७ शासकीय व २ खासगी अशा मिळून ६९ बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोस ३ हजार ३५५ व दुसरा डोस २४९ नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस ४३ हजार ८५७, तर दुसरा डोस १० हजार ७०४ नागरिकांना देण्यात आला आहे.