काेराेनावर नियंत्रण मिळविण्याचा लाॅकडाऊन हा चांगला पर्याय असला, तरी लाॅकडाऊनमुळे अनेकांचे हाल हाेतात. गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरुवातीच्या कालावधीत नागरिक घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेत हाेते. मात्र, मध्यंतरी नागरिक अगदीच बिनधास्त झाले. त्यामुळेच काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बाहेर पडताना प्रत्येकाने मास्क घातल्यास काेराेनावर नियंत्रण ठेवणे शक्य हाेणार आहे.
व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात...
लाॅकडाऊनच्या कालावधीत सर्वच व्यवहार ठप्प ठेवले जातात. काही माेठ्या दुकानांमध्ये पाच ते सहा कामगार आहेत. दुकान बंद असल्याने त्यांची राेजीरोटी बुडेल, तसेच दुकानदारांचाही ताेटा हाेईल. सर्वसामान्य व्यक्तीला वस्तू मिळणे कठीण हाेईल. त्यामुळे लाॅकडाऊन न करता, काेराेना प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी जनतेमध्ये जागृती करावी.
- गुरुदेव हरडे, सचिव, गडचिराेली जिल्हा व्यापारी संघटना
मास्क घालणे हा काेराेना प्रतिबंधाचा चांगला उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क घालावा. मागील लाॅकडाऊन उठविल्यानंतर व्यवसाय पूर्ववत हाेण्यास दाेन महिन्यांचा कालावधी लागला हाेता. आता परत लाॅकडाऊन झाल्यास व्यापारी तसेच सर्वसामान्यांचे माेठे नुकसान हाेणार आहे. जनतेने काळजी घेण्याची गरज आहे.
- मनाेज देवकुले, काेषाध्यक्ष, गडचिराेली जिल्हा व्यापारी संघटना
धाेका वाढताेय
साेमवारी पुन्हा ९ काेराेनाबाधितांची भर पडली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७२ वर पाेहाेचली आहे. प्रत्येकदिवशी काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, काेराेनाचा धाेका आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, गडचिराेली शहरातच काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
काेराेनाचे एकूण रुग्ण ९,४६८
बरे झालेले रुग्ण ९,२९१
काेराेना बळी १०५