हा उपक्रम गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासन, कृषी विभाग तसेच वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. यावेळी देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डाॅ. विशाल जयस्वाल, वडसा वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी आर. एम. शिंदे, तालुका कृषी अधिकारी गेडाम, मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतक-यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याबाबत, मत्स्य पालन तसेच कोणत्याही लागवडीविना भरघोस उत्पन्न देणारे विविधप्रकारची फळझाडे यात शेवगा, आंबा, फणस, जांभूळ, पेरू, आवळ्याची लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन उपस्थित शेतक-यांना या झाडांचे रोपटे उपलब्ध करून देण्यात आले. तथापी इच्छुक शेतक-यांना शासकीय स्तरावरून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासंबंधाने व शेतक-यांना शासनातर्फे योजनांना लाभ मिळण्याकरिता अर्ज मागवून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत आश्वस्त करण्यात आले. मेळाव्याला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
120721\4044152-img-20210712-wa0012.jpg
देसाईगंज येथील पोलीस स्टेशनमध्ये कृषी मेळावा संपन्न..