गडचिराेली : दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दरवाढ गेल्या दीड वर्षांपासून काेराेना असतानाच सुरूच आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने साखरेचे दर कमी हाेतील, अशी अपेक्षा लाेकांना हाेती; परंतु दर कमी झाले नाही. जिल्ह्यात किरकाेळ व्यावसायिक ३८ ते ४० तर ठाेक व्यावसायिक ३४ ते ३६ रुपये प्रति किलाे दराने साखरेची विक्री करीत आहेत.
बाॅक्स ......
उत्पादनावरील परिणामामुळे वाढले दर
गेल्या दीड वर्षापासून विषाणूचे संकट आहे. त्यामुळे साखर उत्पादनावर परिणाम झाला. याशिवाय बाहेर देशातून साखरेची आवश्यक प्रमाणात आवक हाेत नसल्याने साखरेचे दर स्थिर आहेत. अनेकदा किंचित प्रमाणात दर कमी-जास्त झाले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने किरकाेळ तसेच ठाेक व्यावसायिक दर कमी करण्यास तयार नाहीत. जे दर कायम आहेत त्याच दरात साखरेची विक्री सुरू आहे. काेराेनामुळे कृषी उत्पादनावरही विपरीत परिणाम झाल्याने साखरेसाठी आवश्यक कच्चा माल पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाला नाही. त्यामुळे दर वाढून सध्या स्थिर असल्याचे दिसून येते.
काेट ....
महिन्याचे बजेट वाढले
आमच्या कुटुंबात १० सदस्य आहेत. सकाळ व सायंकाळी सर्वजण चहा पितात. आम्हाला गाेड चहा पिण्याची सवय असल्याने दर आठवड्याला अडीच किलाे साखर लागते. दरवाढीचा परिणाम साखर खरेदीवर झाला.
- वनिता सिडाम, गृहिणी.
आमच्या कुटुंबात मधुमेह रुग्ण आहेत. त्यामुळे आम्ही गाेड पदार्थ कमी प्रमाणात खात असलाे तरी सणासुदीला काही प्रमाणात पदार्थ तयार करावे लागतात. महागडी साखर परवडत नसल्याने सध्या आम्ही साखरेचा अल्प वापर करीत आहाेत.
- वंदना काळबांधे, गृहिणी.
बाॅक्स ......
साखरेचे दर (प्रती किलाे)
जानेवारी - ३६
फेब्रुवारी - ३४
मार्च -३६
एप्रिल -३६
मे - ३८
जून -३५
जुलै -३६
ऑगस्ट -३८
बाॅक्स ....
१७० - जिल्ह्याला दरराेज लागते साखर
२३० - श्रावण महिन्यात मागणी वाढली