लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रक्षाबंधनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने महिला गाव संघटनांतर्फे ‘राखी विथ खाकी’ हा अनोखा उपक्रम जिल्हाभरातील पोलीस स्टेशनमध्ये राबविण्यात आला. या अंतर्गत पोलिसांना महिलांनी राखी बांधून जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्याची ओवाळणी मागितली.गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गडचिरोली शहर, लांजेडा वॉर्डातील महिलांनी पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्यासह कर्मचाऱ्यांना राखी बांधून ओवाळणीत शहर तंबाखू व दारूमुक्त करण्याचे वचन मागितले.सिरोंचा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक अजय अहिरकर व एसआरपी जवानांना महिलांनी राखी बांधली.एटापल्ली येथे एसडीपीओ सुदर्शन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांना महिलांनी राखी बांधली.देसाईगंज तालुक्यातील गावसंघटनेच्या महिलांनी पोलीस स्टेशन गाठून अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. आरमोरी पोलीस ठाण्यात शहरातील व किटाळी येथील महिलांनी पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक बोंडसे, पोलीस कर्मचारी व गृहरक्षकांना राखी बांधून दारुमुक्त गाव व तालुका करण्याची ओवाळणी मागितली.मुलचेरा येथील पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाच्या निमित्याने सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक व कर्मचारी यांच्यासह एसआरपीएफच्या जवानांना राखी बांधली.कोरची येथील तपासणी नाका तसेच बेडगाव येथील पोलीस मदत केंद्रात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रभारी अधिकारी नितेश पोटे, पोलीस उपनिरीक्षक नाणेकर यांच्यासह सीआरपीएफचे अधिकारी, जवान व पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधली.कुरखेडा पोलीस ठाण्यात ठाणेदार सुधाकर देठे, एपीआय समीर केदार यांच्यासह ४३ कर्मचाऱ्यांना आंधळी, वाकडी, तडेगाव येथील महिलांनी राखी बांधली.घोट पोलीस मदत केंद्रात एपीआय एम. एन. जगदाळे, पीएसआय हनुमंत तरटे व अशोक पोरेड्डीवार यांच्यासह कर्मचाºयांना महिलांनी राखी बांधली.पोलिसांनी दिले वचनदारू व तंबाखू बंदी करण्यासाठी महिलांनी पोलिसांना राखी बांधून ‘मी गावातील दारू बंद करेन’ अशा आशयाच्या पत्रकावर स्वाक्षरीयुक्त वचन मागितले. शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी दारू व तंबाखूमुक्त करण्याची मागणी महिलांनी मागितल्यानंतर पोलीस तुमच्या सदैव पाठिशी राहणार तसेच दारूबंदीसाठी प्रयत्न करू, असे वचन पोलिसांनी गाव संघटनांच्या महिलांना दिले.
दारू व तंबाखूबंदीची ओवाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 5:00 AM
देसाईगंज तालुक्यातील गावसंघटनेच्या महिलांनी पोलीस स्टेशन गाठून अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. आरमोरी पोलीस ठाण्यात शहरातील व किटाळी येथील महिलांनी पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक बोंडसे, पोलीस कर्मचारी व गृहरक्षकांना राखी बांधून दारुमुक्त गाव व तालुका करण्याची ओवाळणी मागितली.
ठळक मुद्देराखी विथ खाकी उपक्रम : गडचिरोलीसह जिल्हाभरातील पोलीस ठाण्यात कार्यक्रम