आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट, सर्च संस्था आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनता यांच्या संयुक्त सहभागातून मुक्तिपथ अभियान चालविले जात आहे. या अभियानातून दारू व तंबाखुमुक्तीसाठीचे कार्य सुरू आहे. या कार्यात आता प्रशासनाकडूनही सहयोग मिळत आहे. मात्र गडचिरोली जिल्हा १०० टक्के दारू व तंबाखूमुक्त होण्यासाठी लोकचळवळ निर्माण होण्याची गरज आहे, असा मानस सर्चचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केला.स्थानिक मुक्तीपथच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी माध्यमांसोबत संवाद या मथळ्यांतर्गत आयोजित बैठकीत त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. जिल्ह्यात १ सप्टेंबर २०१६ पासून दारू व तंबाखुमुक्तीसाठी मुक्तीपथ अभियान राबविण्यात येत आहे. मागील काही दिवसांमध्ये मुक्तीपथच्या माध्यमातून कायदा अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून नियोजन केल्या गेले. यामध्ये जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांची पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली व कृतीसाठी नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटलांची बैठक घेवून कृती आराखडा तयार करण्यात आला. दारू व तंबाखूबंदीसाठी तक्रार नोंदणीसाठी हेल्पलाईन तयार करण्यात आली.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने विविध तालुक्यात तंबाखूबंदीसाठी धाडी टाकण्यात आल्या. गडचिरोलीत अन्न व औषध विभागाची चमू लहान असल्यामुळे नागपूर येथून सदस्यांना नेमून कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील आदिवासी भागात इलाका बैठकी घेऊन दारूमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात आले. व्यापक जाणीव जागृती कार्यक्रमांतर्गत गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, पोळा, मार्कंडादेव व चपराळा यात्रा उत्सवात दारू व तंबाखुमुक्तीसाठी विविध पध्दतींचा वापर करून व्यापक जाणीव जागृती करण्यात आली. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत डॉ. अभय बंग यांनी व्यसन सोडण्याबाबतचे गैरसमज चर्चेदरम्यान दूर केले. यावेळी मुक्तीपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, संतोष सावळकर उपस्थित होते.पत्रकारांना पुरस्कारतंबाखू व दारूमुक्तीच्या कार्याला लोकांकडून प्रतिसाद मिळून लोकचळवळ निर्माण होण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्तीवर लिखाण करणाºया पत्रकारांसाठी पुरस्काराची योजना डॉ. अभय बंग यांनी यावेळी जाहीर केली. माध्यमाने व्यसनमुक्तीची चळवळ उभारावी, असेही ते म्हणाले.३९७ ग्रा.पं.मध्ये व्यसनमुक्ती समित्या स्थापनसध्यास्थितीत जिल्ह्यातील ४५६ पैकी ३९७ ग्रामपंचायतीमंध्ये व्यसनमुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. १५०० पैकी १२०३ गावांमध्ये गावसंघटन स्थापन करण्यात आले. तर ६४१ गावांनी दारूविक्री बंदीचा ठराव घेतला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
दारू व तंबाखूमुक्तीची लोकचळवळ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:00 AM
महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट, सर्च संस्था आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनता यांच्या संयुक्त सहभागातून मुक्तिपथ अभियान चालविले जात आहे.
ठळक मुद्देअभय बंग यांचा मानस : माध्यमांसोबत साधला संवाद, व्यसनमुक्तीसाठी पोलीस व शिक्षण विभाग सक्रिय