लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : माझ्या घरी कोणी दारू पीत नाही म्हणजे दारू ही माझी समस्याच नाही, असे अनेकांना वाटू शकते, परंतु दारूच्या नशेत गाडी चालवताना अपघातातील पीडित माणूस कोणीही असू शकतो, असे सांगून ‘दारू ही वैयक्तिक नाही, तर सामाजिक समस्या आहे’, असा संदेश मुक्तिपथतर्फे गडचिरोली शहरात पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शहरामधील लोकांना दारूच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन पथनाट्याच्यातून केले.गडचिरोलीतील फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय व मुंबईतील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गडचिरोलीतील बस स्थानक, गोकुळनगर व चंद्रपूर रस्त्यावर पथनाट्य सादर केले. गावांमधील लोक दारू मुक्तीसाठी एकत्र येतात, महिला संघटनांच्या पुढाकाराने दारू नष्ट केली जाते, दारू विक्रेत्यांची तक्रार दिली जाते. शहरात सर्वात जास्त प्रमाणात दारू विक्री होऊनही शहरातील नागरिकांना मात्र दारूच्या समस्येचे गांभीर्य अजूनही जाणवत नाही. अशा नागरिकांना दारू ही सामाजिक समस्या असल्याचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला.गोकुलनगरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते. या ठिकाणीसुद्धा पथनाट्य सादर केल्यावर तेथील महिलांनी आपल्या समस्या मुक्तिपथच्या चमूला सांगितल्या. शहरातील लोकांनी एकत्र येऊन मोहल्ला संघटन निर्माण करून दारूविक्रीवर प्रतिबंध घालावा, असे आवाहन मुक्तिपथच्या चमूतर्फे करण्यात आले.फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय व निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी मागील महिनाभरापासून मुक्तिपथमध्ये आंतरवासिता करीत आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांनी पथनाट्य तयार केले असून त्याचे सादरीकरण शहरीभागात करून दारूविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
दारू वैैयक्तिक नाही, सामाजिक समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:34 AM
माझ्या घरी कोणी दारू पीत नाही म्हणजे दारू ही माझी समस्याच नाही, असे अनेकांना वाटू शकते, परंतु दारूच्या नशेत गाडी चालवताना अपघातातील पीडित माणूस कोणीही असू शकतो, असे सांगून ‘दारू ही वैयक्तिक नाही, तर सामाजिक समस्या आहे’, असा संदेश मुक्तिपथतर्फे गडचिरोली शहरात पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला.
ठळक मुद्देमुक्तिपथतर्फे व्यसनमुक्ती जनजागृती : बसस्थानक, गोकुलनगर व चंद्रपूर मार्गावर सादर केले पथनाट्य