धानोरा येथे २१ जून रोजी आरक्षण हक्क कृती समिती धानोरातर्फे घेण्यात आलेल्या सहविचार सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बाेलत हाेते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा होते. मार्गदर्शक म्हणून गौतम डांगे, विशेष अतिथी डॉ. योगीराज कराडे, लालाजी उसेंडी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने ७ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार रद्द केलेल्या ३३ टक्के आरक्षणाच्या व इतर मागण्यासंदर्भात २६ जून २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात सहभागी होण्याबाबत धानोरा येथे सहविचार व मार्गदर्शन सभा घेण्यात आली. आरक्षण हे घटनेने बहुजनांना दिलेले कवच आहे, ते हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे बहुजनांनी ताकदीने रस्त्यावर उतरावे व सरकारचा प्रयत्न हाणून पाडावा अन्यथा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आरक्षण हक्क कृती समिती धानोरा तालुका समन्वयक वनिश्याम येरमे यांनी केले तर आभार ओमप्रकाश शिडाम यांनी मानले.
आरक्षणाच्या रक्षणासाठी सर्व बहुजनांनी एक व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:25 AM