शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

मेडिगड्डाच्या विषयावर सर्वच पक्ष आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:00 AM

१० पेक्षा जास्त गावांना बसत असल्याने नागरिकांमध्ये चांगलाच असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी आमदार धर्मरावबाबा यांनी सोमवारी या प्रकल्पात ‘डुबकी लगाओ’ आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. लवाजम्यासह ते प्रकल्पावर पोहोचलेही, पण प्रत्यक्षात आंदोलन झालेच नाही.

ठळक मुद्दे‘डुबकी’ आंदोलन झालेच नाही : आविसं, शिवसेनेनंतर धर्मरावबाबांनी केली नुकसानीची पाहणी, प्रकल्पालाही भेट

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारच्या महत्वाकांक्षी मेडिगड्डा बॅरेजच्या बॅक वॉटरचा फटका सिरोंचा तालुक्यातील १० पेक्षा जास्त गावांना बसत असल्याने नागरिकांमध्ये चांगलाच असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी आमदार धर्मरावबाबा यांनी सोमवारी या प्रकल्पात ‘डुबकी लगाओ’ आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. लवाजम्यासह ते प्रकल्पावर पोहोचलेही, पण प्रत्यक्षात आंदोलन झालेच नाही.मेडिगड्डा प्रकल्पाचे ८५ दरवाजे बंद केल्यानंतर गोदावरीच्या पात्रातील पाणी पातळी वाढून पाण्याचा ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. त्यामुळे तोंडाशी आलेले लाखो रुपयांचे पिक वाया गेले. ज्या शेतात पाणी शिरले ती शेतजमीन मेडिगड्डा प्रकल्पाकडून अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात खरेदी झालेली नसताना तेलंगणा सरकारने पाणी अडवून शेतकºयांचे मोठे नुकसान केले. या नुकसानीची भरपाई तेलंगणा सरकारने द्यावी यासाठी सुरूवातीला आदिवासी विद्यार्थी संघाने आवाज उठवत हा प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील शेतकºयांच्या जीवावर उठणारा असल्याचे सांगत तेलंगणा सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा शेतकºयांच्या असंतोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला. रविवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख किशोर पोतदार, आरमोरीचे माजी आमदार रामकृष्ण मडावी, जिल्हा प्रमुख राज गोपाल व इतर पदाधिकाºयांनी शेतकºयांची भेट घेऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तेलंगणा सरकारने या नुकसानीपोटी किमान हेक्टरी १३ लाख रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान दोन दिवसांपूर्वी अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनीही मेडिगड्डाच्या विषयावर आक्रमक पवित्रा घेत नुकसानभरपाई देण्याच्या मागणीकडे तेलंगणा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डुबकी लगाओ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी विविध कार्यक्रम आटोपत ते प्रकल्पस्थळी पोहोचली. स्वत: धर्मरावबाबा आंदोलनात सहभागी होणार असल्यामुळे त्यांना पाठींबा देण्यासाठी आणि आपल्या व्यथा मांडण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी हजर झाले होते. यावेळी आ.धर्मरावबाबांनी तेलंगणा मुर्दाबादचे नारे लावत शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या समस्येची माहिती मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री आणि पालकमंत्र्यांना सांगितली असून त्याबाबत रितसर निवेदनही देणार असल्याचे ते म्हणाले.आ.धर्मरावबाबा यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन डुबकी लगाओ आंदोलन करणार असल्याचे सांगितल्याने याबाबतची चर्चा सिरोंचा तालुक्यासह जिल्हाभर होती. परंतू हे आंदोलन का झाले नाही याबाबत कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू होत्या.लोकांची निव्वळ दिशाभूलमेडिगड्डा प्रकल्प सिरोंचा तालुक्यासाठी नुकसानकारक ठरणार हे आम्ही आधिपासून सांगत होतो. म्हणूनच आदिवासी विद्यार्थी संघाने सुरूवातीपासून आंदोलन केले. पण आज आंदोलनाची भाषा करणारे त्यावेळी चिडीचूप होते. आजही ते प्रत्यक्ष काही न करता लोकांची दिशाभूल करत आहेत. आम्ही मात्र आमच्या भूमिकेवर ठाम असून शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहू.- अजय कंकडालवार,अध्यक्ष, जिल्हा परिषद 

टॅग्स :Socialसामाजिक