आढावा बैठक : अनुसूचित जमाती केंद्रीय आयोगाच्या सदस्यांचे निर्देशगडचिरोली : आदिवासी भागाच्या व आदिवासींच्या विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते यांनी मंगळवारी येथे केले.गडचिरोली जिल्ह्याच्या एकदिवसीय भेटीत त्यांनी आदिवासी विकास विभागांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक होते. सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्याचा आदिवासी उपयोजना आराखडा २२७ कोटी रुपये होता. मंजूर तरतूदीपैकी २२२ कोटी ८५ लक्ष हा निधी प्राप्त झाला. तो पूर्ण खर्च करण्यात आला. जिल्ह्यात गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथे प्रकल्प अधिकारी कार्यालये आहेत. या बाबत आदिवासी प्रकल्पाधिकारी कार्यालयातील नियोजन अधिकारी खडतकर यांनी पॉवर पॉईन्ट सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती यावेळी सादर केली. या निधीखेरीज जिल्ह्यात ५० टक्के आदिवासी लोकसंख्या असल्याने &पेसा कायदा लागू असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींना थेट निधी शासन देते. या १६ कोटीहून अधिक रकमेच्या विनीयोगाबाबतही इवनाते यांनी माहिती जाणून घेतली.उपजिवीका आणि कौशल्य प्रशिक्षणातील काही भाग तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता कालबाह्य झाला आहे. त्यात कालानुरुप बदल करण्यासाठी आपण प्रयत्न करु असे इवनाते यावेळी म्हणाल्या.या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदीसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम करावे
By admin | Published: April 12, 2017 1:04 AM