लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्याच्या रेपनपल्ली उपपोलीस ठाण्याच्या वतीने कमलापूर येथे रविवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उपस्थित नागरिकांना कपडे, भांडे व तर जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफ बटालियन नऊचे सहायक कमांडंट सचिनकुमार होते. मेळाव्याचे उद्घाटन कमलापूरच्या सरपंच रजनिता मडावी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रमनयाजी कोलेट्टीवार, लुचाकी मोहरकर, सिताराम मडावी, सुरेश येलम, मोंडी कोटरंगे, पुरूषोत्तम येजुलवार, पी. पी. ढोबळे, रेपनपल्ली उपपोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी संदीप ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मेळाव्यात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. छल्लेवाडा येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील गुरनुले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कमलापूर, ताटीगुड्डम, कोळसेलगुड्डम, छल्लेवाडा, रेपनपल्ली, मोदुमोडगू आदी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार पीएसआय तिजारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.व्यसनाच्या आहारी जाऊ नका -ढोबळेव्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक संसार उद्ध्वस्त होतात. शिवाय तंबाखू व दारूच्या व्यसनांमध्ये हजारो रूपये खर्च होतात. त्यामुळे नागरिकांनी व्यसन पूर्णत: सोडून द्यावे. पैशाची बचत करून त्यातून मुलांच्या शिक्षणावर खर्च केला पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस अधिकारी ढोबळे यांनी केले.
नागरिकांना साहित्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:11 AM
अहेरी तालुक्याच्या रेपनपल्ली उपपोलीस ठाण्याच्या वतीने कमलापूर येथे रविवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उपस्थित नागरिकांना कपडे, भांडे व तर जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देकमलापुरात जनजागरण मेळावा : सहा गावातील शेकडो नागरिकांची हजेरी