राज्यात काेराेना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्याचा परिणाम राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात दिसून येत आहे. धानोरा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी नगरपंचायतीकडून जनजागृती करण्यात येत आहे. मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे स्वतः शहरात फिरून शहरवासीयांना जागृत करीत आहेत. शहरातील, तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात येत आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग हाेऊन नये, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे दररोज तापमान व ऑक्सिमीटरने चाचणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील जेएसपीएम कॉलेज, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, प्रियदर्शनी कन्या विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इतर शाळांना थर्मलगन व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीच्या कर्मचारी लक्ष्मी हेडाऊ, अश्विन पडोळे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते.
शाळांना थर्मलगन, ऑक्सिमीटर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:36 AM