गतवर्षीपासून ऐन लग्न समारंभ सोहळ्या दरम्यान लॉकडाऊन होत आहे. शासन व प्रशासनाने उपस्थितीबाबत नियम दिले आहेत, त्यामुळे या नियमानुसार सोहळे पार पडत आहेत; मात्र धार्मिक कार्यक्रमप्रसंगी वाद्य वाजवून चार पैसे कमावून वर्षभर उदरनिर्वाह करणाऱ्या मादगी समाजावर मोठा अन्याय होत आहे. या समाजातील वादक वाद्य वाजवून त्यातून मिळणाऱ्या पैशावर कुटुंब व मुलाबाळांचे शिक्षण करीत असतात, तसेच या समाजात भूमिहीन कुटुंबाची संख्या भरपूर आहे. वादन कामाच्या मोबदल्यात मिळणारे दानसुद्धा बंद झाले आहे, त्यामुळे परंपरागत व्यवसाय संकटात आला आहे. वादनाचे अस्तित्व टिकविण्यासाठी हंगामी तसेच इतर धार्मिक कार्यक्रमप्रसंगी वाद्य वाजवून आपली उपजीविका करीत असतात. वाद्य व्यवसाय गतवर्षीपासून डबघाईला आला आहे, त्यामुळे या कुटुंबातील लोकांना जीवन जगणे कठीण जात आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये देण्याची तरतूद करावी, असेही रामटेके यांनी मागणी केली आहे.
बॅण्ड व संदल वादकांना वाद्य वाजविण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:25 AM