पालकमंत्र्यांना निवेदन : महागाव (बु.), महागाव (खु.) व खमनचेरू येथील नागरिकांची मागणीअहेरी : केंद्र व राज्य सरकारकडून गरजूंना घरकूल व शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेला रेती घाटांवरून खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. शिवाय अनेक घाटांचे लिलावही झाले नाही. त्यामुळे घरकूल व शौचालय बांधकामासाठी वन विभागाकडून रेती पुरवठा करण्याची परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी महागाव बू., महागाव खू., खमनचेरू ग्राम पंचायतीच्या वतीने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिन्ही गावालगत प्राणहिता नदीचे १०० ते १५० मीटर अंतरावर नदीपात्र आहे. परंतु यंदा रेतीघाटाचे लिलाव झाले नाही. सध्या रेती घाट आलापल्ली वन विभागाच्या अधिनस्त आहेत. त्यांच्याकडून रेतीघाटाचे लिलाव होऊ शकत नाही. जवळपास एका घरकुलासाठी १० ते १५ ब्रास रेती वापरावी लागते. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी एक ब्रास रेती नेण्यास मनाई करीत आहेत. चिंचगुंडी रेतीघाटाचा लिलाव झाला आहे. त्या रेतीघाटावरून परवानाकृत रेती आणून घरकुलाचे बांधकाम करावे, असे अधिकारी सांगत आहेत. चिंचगुंडी रेतीघाटावर एका परवान्यासाठी तीन हजार रूपये लागतात. हे गरिबांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. या रेतीघाटावर १ हजार ४०० परवाने उपलब्ध असून संपूर्ण अहेरी तालुक्यात इतरत्र कुठेही रेती घाटाचे लिलाव झालेले नाही. उपलब्ध परवान्यातून शासनाची विकास कामे व शासनाच्या योजनांतून होणारे बांधकाम याकरिता रेतीचा उपयोग करणे आवश्यक असते. परवानाकृत रेती परवडणारी नाही. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत घरकूल व शौचालयाचे बांधकाम पूर्ण करायचे असून याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. शासनाने दिलेल्या घरकूल व शौचालय बांधकाम योजनेसाठी परवानाकृती रेती घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. शासनाने ठरवून दिलेला निधी कमी पडतो. त्यामुळे अतिरिक्त परवाने उपलब्ध करून द्यावे, आलापल्ली वन विभागाकडून गरिबांना रेती वाहतूक करण्यास परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय अलोणे, भीमराव कांबळे, राजेश्वर रामटेके, भीमन्ना बदीवार, सत्यम गर्गम, विनोद गर्गम, वासुदेव गोंगले, राजाराम गर्गम, शिवराम गर्गम, अशोक दुर्गे, विठ्ठल दुर्गे, रवी रामटेके, छत्रपती अलोणे, शिवराम टेकुल, शंकर पानेम, सत्यनारायण पानेम, बाबुराव मोहर्ले, स्वामी आत्राम, प्रेमकुमार ओंडरे, आनंदराव गोंगले, दौलत गोंगले, शिवकुमार जनगम, गौतम बाला, शंकर मुंजमकर, मनोहर मंजुमकर, पुंडलिक अलोणे, मनोहर अलोणे, शिवकुमार पानेम, श्रावण पानेम, लचमा वेलादी यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (प्रतिनिधी)
घर बांधकामासाठी रेतीची परवानगी द्या!
By admin | Published: February 14, 2017 12:47 AM