गडचिराेली आगाराला दाेन शिवशाही बसेस देण्यात आल्या आहेत. या बसेस सर्वसाधारण बसच्या तुलनेत आकाराने माेठ्या आहेत, तसेच वातानुकूलित आहेत. त्यामुळे या बसेसला सर्वसाधारण बसच्या तुलनेत अधिक प्रमाणात डिझेल लागते. परिणामी या बसचे भाडेसुद्धा अधिक प्रमाणात आकारले जाते. आता पावसाळा असल्याने प्रवाशांना एसीची आवश्यकता भासत नसल्याने अधिकचे तिकीट देऊन ते शिवशाहीमध्ये बसतीलच याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दाेन्ही शिवशाही बसेस न चालविण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे.
बाॅक्स
एसीमुळे काेराेनाचीही भीती
- एसीच्या खाेल्या बंद राहत असल्याने त्यातून काेराेनाचा प्रसार हाेण्याची शक्यता अधिक राहते. या भीतीमुळेही शिवशाही बसेसमध्ये बसण्यास प्रवासी तयार हाेत नाहीत.
- गडचिराेली आगारात असलेल्या दाेन्ही बसेस गडचिराेली-नागपूर मार्गावर चालविल्या जात हाेत्या.
बाॅक्स
अधिकचे तिकीट कशाला देतील
सध्या पावसाळा सुरू आहे. बसची खिडकी उघडी ठेवली तरी वातावरणातील थंड हवा एसटीत प्रवेश करते. एसीची गरजच नाही. सर्वसाधारण बसचे नागपूरचे तिकीट २१५ रुपये आहे. शिवशाहीसाठी ३२० रुपये माजावे लागतात. याचाही विचार प्रवासी करतात.