बाॅक्स ...
ग्रामीण भागात तर लूटच लूट
शहरातील ग्राहक थाेडेफार जागरूक आहेत त्यामुळे ते डिलिव्हरी बाॅयकडून सिलिंडरची पावती मागतात. मात्र ग्रामीण भागात तर पावती दिलीच जात नाही. सिलिंडरच्या एकूण किमतीच्या थेट ५० ते १०० रूपये आगावूचे मागितले जातात. ग्रामीण भागातील नागरिकांना गॅसची किंमत माहीत राहत नाही. याचा गैरफायदा डिलिव्हरी बाॅयकडून उचलला जात आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या नावाची पावती मागावी.
बाॅक्स ..
नऊ महिन्यांत २०० रूपयांची वाढ
जानेवारी महिन्यात सिलिंडरची किंमत ७५० रूपये हाेती. सप्टेंबर महिन्यात ती आता ९४१ रूपये एवढी झाली आहे. नऊ महिन्यात २०० रूपये वाढले आहेत. तसेच गॅसवर मिळणारी सबसिडी केवळ ४० रूपयांवर येऊन थांबली आहे.
काेट ..
सिलिंडरच्या पावतीवरच वाहतुकीचा खर्च, एजन्सीधारकाचे कमिशन समाविष्ट राहते. त्यामुळे पावतीवर लिहिलेच्या रकमेपेक्षा एकही रूपया अधिकचा देण्याची गरज नाही. मात्र डिलिव्हरी बाॅय सर्रास २० ते २५ रूपये आगावूचे मागतात. सध्या सिलिंडरची किंमत ९४१ रूपये आहे. तेवढेच पैसे द्यावे. एखादा डिलिव्हरी बाॅय अधिकचे पैसे मागत असेल तर, त्याची तक्रार गॅस संचालकांकडे करावी. त्याचा फाेन रेकाॅर्ड करावा. जेणेकरून पुरावा उपलब्ध हाेईल. - उर्मिला श्रीकाेंडावार, गृहिणी