लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महागड्या कीटकनाशकांचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहे. जमिनीचा पोत बिघडण्यापासून तर मानवी जीवास हाणीकारक ठरणाऱ्या कीटकनाशकांचा वापर टाळून त्याला पर्याय म्हणून दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्काचा वापर करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना हा अर्क बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. खरीप हंगामातील पिकांसाठी योग्य ते मार्गदर्शन देताना बीज प्रक्रियेची माहिती, तसेच कीडीसाठी मारक ठरणाऱ्या विविध झाडांच्या पाल्यापासून बनविल्या जाणाऱ्या दशपर्णी अर्काचे आणि निंबोळीचे महत्व शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. एवढेच नाही तर प्रत्यक्ष तो अर्क कसा बनवायचा याचे प्रात्यक्षिकही दाखविले जात आहे.आरमोरी तालुक्यातील रवी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यशाळेला तालुका कृषी अधिकारी जी.एन.जाधव, कृषी सहायक डी.के.क्षिरसागर, वाय.एच.सहारे, अविनाश हुकरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. खते व कीटकनाशकांच्या अतिवापराचे दुष्परिणाम यावरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महागड्या कीटकनाशकांसोबत महागडे बियाणे खरेदी करणे टाळून घरच्या बियाण्यांवर प्रक्रिया कशी करावी, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
दशपर्णी आणि निंबोळी अर्क ठरतील कीटकनाशकाला पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:19 PM
कीटकनाशकांचा वापर टाळून त्याला पर्याय म्हणून दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्काचा वापर करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे.
ठळक मुद्देकृषी विभागाकडून मार्गदर्शनशेतकऱ्यांना अर्क बनविण्याचे प्रशिक्षण