भेंडाळा परिसरातील जनतेला आरोग्याच्या सोयी पुरविण्याकरिता भेंडाळा येथे १ मे २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. या केंद्रांतर्गत भेंडाळा परिसरातील जवळपास ३० ते ३१ गावांचा समावेश होतो. परिसरातील काही गावे १० ते १५ गावे किमी अंतरावर आहेत. या गावांतील गरोदर महिला, आजारी व्यक्ती यांना दवाखान्यात आणण्याकरिता रुग्णवाहिकेचा उपयोग करावा लागतो. यापूर्वी आरोग्य केंद्राला असलेली रुग्णवाहिका नादुरुस्त व जुनी असल्यामुळे रुग्णांना ने-आण करताना मध्येच बंद पडत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिका देण्यात यावी, अशी मागणी वारंवार होत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मागणीची दखल घेत भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाली रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:25 AM