निवेदनात म्हटले की, काही गावांत घराचे बांधकाम ५० वर्षांपूर्वी झाले आहे. यात काही गावांत नालीशेजारी घरे बांधण्यात आली आहेत, हीच बाब हेरून विरोधी गटातील नागरिक विद्यमान सरपंच व सदस्य यांच्या विरोधात तक्रारी करून त्या तक्रारी शहानिशा करून अनेक गावांतील सरपंच व सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे. गावात नालीवर बांधकाम केलेली अनेक घरे रस्त्याच्या लगत दिसून येतात. मात्र, केवळ राजकीय आकसापोटी किरकोळ तक्रारी करून गावागावातील ग्रामपंचायत स्तरावरील राजकारण तापू लागले आहे. त्यामुळे अपात्र करण्याच्या नियमात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघटनेने केली आहे. निवेदन देताना ग्राम संवाद सरपंच संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भगत, अविनाश धामणे, राज्य सरचिटणीस गुणवंत अलमस्त, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष दिवाकर मिसार आदी उपस्थित होते.
220821\img-20210821-wa0190.jpg
निवेदन फोटो सं२पच संघटना