सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून देसाईगंज पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी निर्मला कुचिक , गट समन्वयक विजय बन्सोड व आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख ब्रम्हानंद उईके होते. नियोजन सभेमध्ये कोविड लसीकरण जाणीव जागृती करणे, शाळा पूर्व तयारी म्हणून शाळेची स्वच्छता , शाळा व्यवस्थापन समितीची सभा, शिक्षकांचे लसीकरण , लोकसहभाग, गुणवत्तापूर्ण शिक्षण , ऑनलाईन शिक्षण , शिक्षकांची उपस्थिती , शाळेचा निकाल व नोंदी , छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करणे आदी बाबीवर चर्चा करण्यात आली. यावेळी गट समन्वय विजय बन्सोड , केंद्रप्रमुख ब्रम्हानंद उईके यांनी सभेला मार्गदर्शन केले. सभेला आमगाव केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक व खासगी शाळेतील मुख्याध्यापक सभेला उपस्थित होते.
===Photopath===
250621\3441img20210622102429.jpg
===Caption===
आमगाव केंद्राच्या शाळा पूर्व तायारी नियोजन सभेला मार्गदर्शन करतांना गटसमन्वयक विजय बन्सोड