२१ जून ते १ जुलैदरम्यान गिलगाव परिसरात महाराष्ट्र कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. गिलगाव, नवरगाव, कुंथेगव, भेंडीकन्हार, थाटरी येथे कृषी सप्ताह घेण्यात आला.
जमिनीचे बिघडते आरोग्य टाळून योग्य प्रमाण उपलब्ध करून देण्यासाठी कृषक ॲपची सुविधा करण्यात आली आहे. सदर ॲपमध्ये हवामान, कृषी सल्ला, पशु सल्ला, डेअरी कृषिवार्ता, बाजारभाव, कृषितंत्र, कृषी योजना आदींबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी ॲपचा वापर करून शेतीचे उत्पन्न वाढवावे तसेच अझोला ही वनस्पती उत्तम प्रकारे वाढते. धान उत्पादनासाठी दूध उत्पन्नासाठी सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने हिरवळीचे खत म्हणून ॲझोलाचा वापर फायदेशीर आहे, असेही कृषी सहाय्यक भैसारे यांनी सांगितले. बीजप्रक्रिया बियाणे उगवण, चाचणी प्रयोग, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर, बहुपीक पद्धत, गटशेती, फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन, धान लागवड, तंत्रज्ञान श्री पद्धत, चारसूत्री पद्धत, रासायनिक शेतीचे दुष्परिणाम, तणनाशक वापराचे दुष्परिणाम, पीकविमा, बियाणे खते, घ्यावयाची काळजी, गादी वाफे, रोपवाटिकेचे व्यवस्थापन आदींबाबत चर्चा करण्यात आली.
===Photopath===
250621\1231-img-20210625-wa0075.jpg
===Caption===
जमिनीचे आरोग्य तपासून खताची मात्रा द्यावी फोटो गीलगांव