२१ जून ते १ जुलैदरम्यान गिलगाव परिसरात कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत ते हाेते. गिलगाव, नवरगाव, कुथेगाव, भेंडीकन्हार, थाटरी येथे सभा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सप्ताहादरम्यान कृषी सहाय्यक किशोर भैसारे पुढे बोलताना म्हणाले की, कृषक ॲपमध्ये हवामान, कृषी सल्ला,पशु सल्ला,डेअरी, कृषी वार्ता, बाजारभाव, कृषी तंत्र, कृषी योजना आदींबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांनी ॲपचा वापर करून शेतीमध्ये उत्पन्न वाढवावे. अझोला ही वनस्पती थोड्या अन्नावर उत्तम प्रकारे वाढते धान उत्पनासाठी, दूध उत्पन्नासाठी सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने हिरवळीचे खत म्हणून अझोलाचा वापर फायदेशीर आहे, असेही मार्गदर्शन कृषी सहाय्यक भैसारे यांनी केले.
बाॅक्स
विविध विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद
कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.
बीज प्रक्रिया, बियाणे उगवण चाचणी प्रयोग, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, बहुपीक पद्धत, गटशेती, फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन, भातलागवड तंत्रज्ञान, श्री पद्धत, चारसूत्री पद्धत, पट्टा पद्धत, रासायनिक शेतीचे दुष्परिणाम, तणनाशक वापराचे दुष्परिणाम,पीक विमा, बियाणे खते घ्यावयाची काळजी, गादी वाफे,रोपवाटिकेचे व्यवस्थापन आदींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.