गडचिराेली : जादूटाेण्याच्या संशयातून बारसेवाडात दाेघांना जिवंत जाळल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते, त्याच तालुक्यात २९ एप्रिल राेजी रात्री ८ वाजता जादूटाेण्याच्या संशयावरून वृद्धाला गावातील समाज मंदिराच्या मांडवात बांधून लाथाबुक्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आराेपींनी गरम सळईचे चटके वृद्धाच्या शरीराला देत साेडून दिले, ही घटना एटापल्ली तालुक्याच्या जांभिया येथे ३० एप्रिल राेजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी आठ आराेपींना अटक करण्यात आली आहे.दलसू मुक्का पुंगाटी (६० वर्षे) रा. जांभिया, असे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. जांभिया हे गाव गट्टा पाेलिस मदत केंद्रापासून अवघ्या २ किमी अंतरावर आहे. दलसू पुंगाटी यांना बेदम मारहाण हाेत असल्याचा प्रकार गट्टावरून एटापल्लीकडे जाणाऱ्या एका व्यक्तीने पाहिला. एटापल्लीत आल्यानंतर त्याने चाैकातील पाेलिस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी ठाणेदार नीलकंठ कुकडे यांना कळविले. ठाणेदार कुकडे यांनी गट्टा पोलिसांना ही माहिती दिली. तेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे, ३० एप्रिल राेजी सकाळी गट्टा पोलिस जांभिया गावात पाेहाेचले. पुंगाटी यांना एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. पुंगाटी यांच्या नातेवाईकांनीही गट्टा पाेलिस मदत केंद्रात तक्रार नाेंदवली. त्यानुसार पाेलिसांनी ३० एप्रिल राेजी गुन्हा दाखल करून दुपारी आठही आराेपींना अटक करण्यात आली. पाेलिसांच्या समयसूचकतेने दलसू पुंगाटी यांचे प्राण वाचले. एटापल्ली तालुक्याच्या बारसेवाडा येथे जादूटोण्यांच्या सशंयावरुन जमनी देवाजी तेलामी व देवू कटिया अतलामी या दोद्यांंना जिवंत जाळल्याच्या घटनेबाबत संपूर्ण राज्यात संताप व्यक्त हाेत असतानाच बारसेवाडाच्या घटनेआधी २९ एप्रिल राेजी जांभिया येथे दलसू मुक्का पुंगाटी यांना जादूटाेण्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.आराेपींची न्यायालयीन काेठडीत रवानगीमारहाण प्रकरणातील आराेपी राजू कोकोसी जोई (६०), झुरू मल्लू पुंगाटी (५४), बाजू कोकोसी जोई (५५), रेणू मल्लू पुंगाटी (५०), मैनू दुंगा जोई (३९), शंकर राजू जोई (३१), दिनकर बाजू जोई (२६), विजू गोटा होळी, सर्व रा. जांभिया यांना ३० एप्रिल राेजी अहेरी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांचा पीसीआर मिळाला. ४ मे राेजी पीसीआर संपला. आराेपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आराेपींची रवानगी न्यायालयीन काेठडीत केली.