लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : चंद्रपूरवरून गोंदियाला जाणारी डेमू रेल्वे गुरूवारी रात्री ९.३० वाजता देसाईगंज येथील रेल्वे फाटक ओलांडून जाताना रेल्वे फाटक सुरूच होते. रेल्वे लोकोपायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला असून या प्रकरणी सहायक स्टेशन मास्तरला निलंबित करण्यात आले आहे.देसाईगंज येथील बायपास मार्गावरील रेल्वे फाटक रेल्वे आल्यानंतरही सुरूच होते. रेल्वेच्या लोकोपायलटला रेल्वे आणण्याकरिता हिरवा कंदील मिळाला होता. मात्र रेल्वेचे फाटक सुरूच होते. ही बाब रेल्वे लोकोपायलटच्या लक्षात आली. त्यामुळे पायलटने रेल्वेचा वेग कमी करून रेल्वे फाटकाअगोदरच रेल्वे थांबविली व येणाºयाजाणाºया वाहनांना रस्ता पार करून दिल्यानंतर रेल्वे पुढे काढली.ज्या ठिकाणी रेल्वे फाटक बनविण्यात आले आहे, त्या बायपास मार्गावर रात्रंदिवस वाहनांची मोठी गर्दी राहते. पाच मिनीटे रेल्वे फाटक बंद राहिल्यानंतर शेकडो वाहनांची रांग लागते. रेल्वे लोकोपायलटने रेल्वे थांबविली नसती तर मोठा अपघात घडला असता, रेल्वे चालकाने धोका पत्करत अत्यंत कमी वेगात रेल्वे काढली. याबाबत रेल्वेचे मुख्य स्टेशन अधीक्षक भोंडे यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला असता, रेल्वेच्या सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. रेल्वेफाटकमध्ये कोणताही बिघाड नव्हता, बिघाड असला तरी त्याबाबत पर्यायी व्यवस्था रेल्वेने केली आहे. रेल्वे फाटकावर कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयाने तांत्रिक बिघाडाचा बनाव केला आहे. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या सहायक स्टेशन मास्टर रितेशकुमार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती दिली.
अन् खुल्या फाटकातून रेल्वेगाडी निघाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:27 AM
चंद्रपूरवरून गोंदियाला जाणारी डेमू रेल्वे गुरूवारी रात्री ९.३० वाजता देसाईगंज येथील रेल्वे फाटक ओलांडून जाताना रेल्वे फाटक सुरूच होते.
ठळक मुद्देमोठा अपघात टळला : रेल्वे स्टेशन मास्तर तडकाफडकी निलंबित