शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

रेती तस्करीत आंध्र प्रदेशच्या ट्रकचा समावेश

By admin | Published: May 28, 2016 1:32 AM

तालुक्यातील येल्ला येथील नदीघाटावर रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या आठ ट्रकवर मुलचेरा तहसीलदारांनी कारवाई केली आहे.

मुलचेरा तहसीलदारांची कारवाई : २ लाख २६ हजार ८०० रूपयांचा दंड ठोठावलामुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील नदीघाटावर रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या आठ ट्रकवर मुलचेरा तहसीलदारांनी कारवाई केली आहे. यातील पाच ट्रक आंध्र प्रदेशचे आहेत. यावरून रेती तस्करीचे कनेक्शन आंध्र प्रदेशासोबत जोडले असल्याचे स्पष्ट होत आहे. येल्ला नदीघाटावरून अवैधरीत्या विना परवाना रेतीचा वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार पी. जे. अप्पाले यांना प्राप्त झाली. त्यानुसार २६ मे रोजी नदीघाटावर जाऊन दोन रिकामे व सहा रेतीने भरलेले ट्रक जप्ती केले. जप्ती केलेल्या ट्रकमध्ये दोन महाराष्ट्रातील व तीन आंध्र प्रदेशातील ट्रकचा समावेश आहे. एम. एच. ४० वाय ६४८५, एम. एच. ३४ एम ७६९० या क्रमांकाचे ट्रक रिकामे आढळून आले. तर ए. पी. ०१८- ४०६७, ए. पी. ०१८- ४५२४, ए. पी. ०१८- ३५५५, ए. पी. ०१८- ८८९२, टी. एस. ०१ यू. ए. ३१२९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये रेती भरली असल्याचे आढळून आले. रेतीची वाहतूक करणारे दीपक राठोड यांनी दंडाची २ लाख २६ हजार ८०० रूपये एवढी रक्कम भरल्यानंतर ट्रक सोडण्यात आले. सदर कारवाई तलाठी रितेश चिदमवार, मंडळ अधिकारी सत्यवान भडके, नायब तहसीलदार समशेर पठाण यांनी केली. विशेष म्हणजे रेती ताडपत्री झाकून नेली जात होती. गडचिरोली जिल्ह्यातील इतर घाटांवरूनही रेती तस्करी सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)