लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्कॉय मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार पटकाविलेल्या एंजल देवकुले हिच्या खेळाची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रशंसा केली. एंजल देवकुले हिला मंगळवारी (दि.२२) राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, तर दि.२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पुरस्कारार्थींची भेट झाली.एंजलने मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल ४० पदके पटकाविली आहेत. राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार नाविन्य, समाजसेवा, शैक्षणिक, क्रीडा, कला व संस्कृती, शौैर्य या प्रकारांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो. एंजल ही गडचिरोली येथील स्कूल आॅफ स्कॉलर या शाळेत पाचवीत शिक्षण घेत आहे. नेपाळ, थायलंड या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत तीने सुवर्णपदक पटकाविले. तिच्या या सुवर्णपदकांची यादी बघून पंतप्रधान नरेंद्र मोेदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सुद्धा आश्चर्यचकीत झाले. तिच्या खेळाचे कौतुक करून त्यांनी शाबासकी दिली. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींसह केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या. एंजलचे हे यश जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
एंजलची राष्ट्रपतींकडून प्रशंसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:52 AM
स्कॉय मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार पटकाविलेल्या एंजल देवकुले हिच्या खेळाची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रशंसा केली. एंजल देवकुले हिला मंगळवारी (दि.२२) राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, तर दि.२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पुरस्कारार्थींची भेट झाली.
ठळक मुद्देपंतप्रधानांनी केले कौतुक : राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार प्रदान