लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्याच्या एका अंगणवाडी सेविकेला जिवानिशी ठार मारण्याची घटना घडली. या प्रकरणातील खऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आयटक संघटनेच्या नेतृत्वात शेकडो अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.आयटक व अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने अंगणवाडी सेविकेवर हल्ला झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. त्या अंगणवाडी सेविकेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आपल्या इतर मागण्यांसाठी सदर आंदोलनादरम्यान अंगणवाडी महिला आक्रमक झाल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्य सचिव देवराव चवळे, सिटू संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे, कामगार नेते महेश कोपुलवार, आयटकचे जिल्हा सचिव जगदिश मेश्राम, अमोल मारकवार आदींनी केले. सदर आंदोलनात संघटनेच्या पदाधिकारी राधा ठाकरे, अनिता अधिकारी, जहारा शेख, ज्योती कोमलवार, बसंती अंबादे, रेखा जांभुळे, रूपा पेंदाम यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी महिला सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी महेश कोपुलवार, रमेशचंद्र दहिवडे, देवराव चवळे यांनी अंगणवाडी महिला कर्मचाºयांना संबोधित केले.जिल्हाधिकारी व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.या आहेत मागण्यापीडित अंगणवाडी सेविकेच्या उपचाराचा वैद्यकीय खर्च शासनाने करावा व मनोधैर्य योजनेतून १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. वैद्यकीय उपचार काळात त्या सेविकेला नियमित मानधन द्यावे. त्या सेविकेच्या इच्छेनुसार तिची अंगणवाडी केंद्रात बदली करण्यात यावी. कमी पटसंख्येच्या नावाखाली अंगणवाडी केंद्र बंद करू नये. थकीत मानधन व वाढीव मानधनाचे एरीअस अदा करण्यात यावे. थकीत इंधन बिल व प्रवास भत्ता देण्यात यावा. जि.प. शाळेप्रमाणे अंगणवाडी केंद्रांना उन्हाळी सुटी द्यावी. दुर्गम भागात काम करणाºयांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
संतप्त अंगणवाडी कर्मचारी उतरल्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:33 AM
आयटक व अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने अंगणवाडी सेविकेवर हल्ला झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. त्या अंगणवाडी सेविकेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आपल्या इतर मागण्यांसाठी सदर आंदोलनादरम्यान अंगणवाडी महिला आक्रमक झाल्या होत्या.
ठळक मुद्देआरोपीला शिक्षा देण्याची मागणी : ‘त्या’ पीडित सेविकेच्या न्यायासाठी जि.प. समोर आंदोलन