शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

संतप्त विदर्भवादी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 12:48 AM

स्वतंत्र विदर्भ राज्यासह अहेरी जिल्हा, घोटसह नवीन तालुके निर्माण करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी : गडचिरोली, अहेरी, आरमोरी, पुराडासह अनेक ठिकाणी चक्काजामस्वतंत्र विदर्भ राज्यासह अहेरी जिल्हा, घोटसह नवीन तालुके निर्माण करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला कोरचीपासून सिरोंचापर्यंत सर्व भागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे वाहनातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. जिल्हाभरात जवळजवळ एक हजारावर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. या आंदोलनामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याला जनतेचा पाठिंबा आहे, ही बाब स्पष्ट झाली, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गडचिरोली जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. जिल्हाभर विदर्भवाद्यांच्या आंदोलनाने रस्ते जाम

 

गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, चामोर्शी, घोटसह जिल्ह्याच्या विविध भागात बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान संतप्त विदर्भवाद्यांनी रस्त्यावर चक्काजाम करून काही वेळ वाहतूक रोखून धरली. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त होता.गडचिरोली - येथील इंदिरा गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा गडचिरोलीचे समन्वयक अरूण मुनघाटे, चंद्रशेखर भडांगे, रमेश भुरसे, लोकनेते नामदेव गडपल्लीवार यांच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान चारही मार्गावरची वाहतूक काहीवेळ रोखून धरण्यात आली. ‘विदर्भ नाही कोणाच्या बापाचा, विदर्भ आमच्या हक्काचा, सत्ताधाऱ्यांनो विदर्भ देता की जाता, स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास नाही’ अशा गगणभेदी घोषणा विदर्भवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. या आंदोलनात समया पसुला, पांडुरंग घोटेकर, नामदेव शेंडे, गडसुलवार, रूचित वांढरे, सुधाकर पेटकर, भास्कर बुरे, जनार्धन साखरे, नरेश हजारे, तुळशिराम सहारे, रमेश उप्पलवार, वसंत बद्देलवार, अनिल कोठारे, कौशिक नागरे, भोजराज बोदलकर, बाबुराव भुरसे, खुशाल चिललवार, अनिल चिललवार, लालाजी अंडेगवार, प्रभाकर डोईजड, श्रीकांत मुनघाटे, पंडित पुडके, एजाज शेख, मुकूंद उंदीरवाडे, सूरज गेडाम, धीरज शिनके आदीसह सर्वपक्षीय विदर्भवादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चक्काजाम आंदोलनापूर्वी इंदिरा गांधी चौकात विदर्भवाद्यांची सभा पार पडली. या सभेला अरूण मुनघाटे, चंद्रशेखर भडांगे, नामदेव गडपल्लीवार व इतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची भूमिका आग्रहीपणे मांडली व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती करण्यास केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. चक्काजाम आंदोलनातील अनेक विदर्भवादी कार्यकर्त्यांना गडचिरोली पोलिसांनी वाहनात बसवून पोलीस ठाण्यात नेले. काही वेळानंतर या विदर्भवादी कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.अहेरी - विदर्भ राज्य आंदोलन समिती, अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जवळपास अर्धा तास या मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त होता. या आंदोलनात रघुनाथ तलांडे, अतुल उईके, विलास रापर्तीवार, यशोदा गुरनुले, पार्वता मडावी आदीसह बहुसंख्य विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. अटकेच्या दोन तासानंतर विदर्भवादी कार्यकर्त्यांची पोलिसांनी सुटका केली. आरमोरी - स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आरमोरी येथील वडसा टी-पार्इंटवर विदर्भवादी कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शालिकपाटील नाकाडे, तालुकाध्यक्ष वामनराव जुआरे, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. संगीता रेवतकर, विलास गोंदोळे, मनीषा दोनाडकर आदींनी केले. या आंदोलनात मिलींद खोब्रागडे, गणपती सेलोकर, कुंदा मेश्राम, सोनाली दाणी, रेशमा प्रधान, गीता दोनाडकर, प्रकाश सेलोकर, विठ्ठल हिरापुरे, हरीजी प्रधान, छगन चोपकार, दौलत मुर्वतकर, चिंतामन निमजे, यादव सहारे, ऋषी बांडे, रामभाऊ धोटे, अण्णाजी लिंगायत, हरीहर कापकर, राजू कन्नाके, सूरज भोयर, यश पिल्लारे, ईश्वर वाढई, भास्कर वडपल्लीवार, गोपिचंद सेलोकर, मनोहर गोंदोळे, नितीन मने, रामभाऊ कुर्जेकर, जनार्धन सोनकुसरे, तानबा गोंदोडे, बापू तिजारे, माणिक येंचिलवार आदी विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. देसाईगंज - स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन देसाईगंज येथे कुरखेडा मार्गावर रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व गौरव नागपुरकर, कमलेश बारस्कर, राकेश पुरणवार, शुभम वाढई यांनी केले. या आंदोलनात भर्रे, मुंडले, वाघाडे यांच्यासह बहुसंख्य विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जवळपास एक तास वाहतूक रोखून धरण्यात आली.घोट - स्वतंत्र विदर्भ राज्यासह घोट तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी घोट येथील आंबेडकर चौकात घोट तालुका संघर्ष समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान घोट-आष्टी-रेगडी-चामोर्शी मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. जवळपास चार तास या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाचे नेतृत्व भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, विलास गण्यारपवार, संजय वडेट्टीवार, बाबुराव भोवरे, ग्रा. पं. सदस्य गिरीश उपाध्ये यांनी केले. या आंदोलनात ताराबाई उईके, भारती उपाध्ये, संगीता वडेट्टीवार, बबन धोडरे, ढिवरू बुरांडे, रामचंद्र दुधबावरे, तंमुस अध्यक्ष रमेश दुधबावरे, शरीफ शेख, मुमताज सय्यद, नामदेव कागदेलवार, विजयालक्ष्मी गण्यारपवार, वरूरच्या सरपंच विठाबाई चौधरी, शिमुलतलाचे सरपंच सजल बिश्वास, सुशिला आत्राम, दिनकर लाकडे, विजया पोगुलवार, सुनीता आत्राम, ललीता कागदेलवार, अल्का चांदेकर, अमिता पोरेड्डीवार, अशोक बोदलकार, चंद्रकला आत्राम, गुरूदास वैरागडे, वसंत दुधबावरे, भिका जुवारे यांच्यासह बहुसंख्य विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. कुरखेडा - दुपारी १२ वाजता येथील कुरखेडा-वडसा मार्गावर बायपासजवळ तब्बल अडीच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांची रांग लागल्याने वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे तालुकाध्यक्ष गणपत सोनकुसरे, तालुका संघटक वामन सोनकुसरे, शहर प्रमुख तलत सय्यद, घिसू खुणे, श्रीहरी किरंगे, डॉ. राधेश्याम उईके, प्रमोद खुणे यांनी केले. या आंदोलनात मंगलू हलामी, श्यामराव कोरेटी, शांता खुणे, फुलमा मडावी, सुमन पंधरे, काटेंगे, नरोटे, मुरलीधर लंजे, नेवारे, सोमकारसिंह चव्हाण, हिरामन दमाई, रामचंद्र लिल्हारे, किसनलाल साहळा, राजीराम साहळा, दर्शन सेदूर, रामरतन सोनकुकरा, बिरबल चावर, क्रिष्णा ब्रम्हनायक, सकिना कपुरडेरिया, बिरीज सांगसुरपार, शांता कपुरडेरिया आदी विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथील ठाणेदार योगेश घारे, पोलीस उपनिरीक्षक कटारे यांनी आंदोलकांशी चर्चा करीत त्यांच्या भावना शासनाकडे पोहोचविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पुराडा - कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथे रामगड-कोरची-कुरखेडा मार्गावर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्रसिंह ठाकूर यांनी केले. यावेळी रामचंद्र कोडाप, मडकाम, सिंग, अशोक उसेंडी, दिवाकर मारगाये, केसरशहा सयाम, सहारे, पेशिलाल सोनागर, तुळशिराम टिचक, पंढरी मारगाये, रेखा ब्रम्हनायक आदींसह हेटीनगर, कन्हाळटोला, पुराडा, कुंभीटोला, खेडेगाव येथील विदर्भवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहतूक रोखून धरल्यामुळे कोरची-कुरखेडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)