लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत नेंडेर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शैक्षणिक नुकसानीच्या मुद्यावर सामाजिक कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी संतप्त झाले. अखेर शिक्षकांच्या मागणीला घेऊन संतप्त विद्यार्थी व पालकांनी शुक्रवारी थेट एटापल्लीच्या पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला.यापूर्वी नेंडेर येथील नागरिकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्यावेळी ७ आॅगस्टला शिक्षण विभागाने पी.पी. आकिनवार, व्ही.ए. गुरनुले व डी.ए. नागपुरवार या तीन शिक्षकांचे नियुक्ती आदेश काढले. मात्र यापैकी केवळ पी.बी. आकिनवार हे एकमेव शिक्षक शाळेत रूजू झाले. अन्य दोन शिक्षक शाळेत रूजूच झाले नाही. शैक्षणिक सत्र सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला. शिक्षकांअभावी शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा वारंवार प्रशासनाकडे मांडण्यात आला. मात्र यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी राकाँचे दौलत दहागावकर, बाजीराव हिचामी, मासा हिचामी, इसू हिचामी, मंगेश हिचामी, सुरेश हिचामी हजर होते. यावेळी बीडीओ अनिल वाघमारे यांनी शिक्षक सोमवारला रूजू होतील, असे चर्चेदरम्यान सांगितले.
संतप्त विद्यार्थी पंचायत समितीवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:38 AM
स्थानिक पंचायत समितीअंतर्गत नेंडेर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शैक्षणिक नुकसानीच्या मुद्यावर सामाजिक कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी संतप्त झाले.
ठळक मुद्देबीडीओंशी केली चर्चा : नेंडेर शाळेचा प्रश्न