पाथरगोटातील प्रकार : एफडीसीएमला विरोध कायमचआरमोरी : वन विकास महामंडळामार्फत आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा, सालमारा, सावलखेडा, पळसगाव व जोगीसाखरा परिसरातील जंगल क्षेत्रात वृक्षतोड सुरू आहे. ग्रामसभांना विश्वासात न घेता एफडीसीएमचे अधिकारी जंगल नष्ट करीत असल्याचा आरोप करीत पाथरगोटातील संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी कक्ष क्रमांक ८३ एबीमधील वृक्षतोड बंद पाडली. आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा, सालमारा, सावलखेडा, पळसगाव, जोगीसाखरा या गावालगतच्या जंगलावर स्थानिक नागरिकांचा रोजगार अवलंबून आहे. शिवाय पाळीव जनावरे चरण्यासाठी सदर जंगल परिसर आवश्यक आहे. असे असतानाही शासनाने या भागातील जंगल क्षेत्र एफडीसीएमला हस्तांतरीत केले. उच्च दर्जाचे रोपवन तयार करण्याच्या नावाखाली एफडीसीएमने गेल्या अनेक दिवसांपासून या भागात वृक्षतोड सुरू केली आहे. एफडीसीएमच्या या वृक्षतोडीस ग्रामस्थांकडून प्रचंड विरोध होत आहे. पाथरगोटावासीयांनी एकत्र देऊन वृक्षतोड थांबविली. यावेळी दिलीप घोडाम, शरद दोनाडकर, देवेंद्र मडावी, बगमारे, आनंदराव राऊत, भुमेश्वर राऊत, हरिचंद्र ठाकरे, मंगरू वरखडे, पंढरी दोनाडकर, शंकर नखाते, काशिनाथ दोनाडकर, विनायक बनकर, रघुनाथ प्रधान, पुंडलिक दोनाडकर, संगिता हजारे, मंगला घुटके, रूध्दा गजभिये, राणी मेश्राम, राजेंद्र बगमारे, नरहरी पिल्लारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)२७ ला चक्काजाम आंदोलनएफडीसीएममार्फत होणारी वृक्षतोड बंद करण्यात यावी. या मागणीसाठी पाथरगोटावासीय २७ मे रोजी आरमोरी येथे शासनाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करणार आहेत. अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गणपत दर्वे यांनी केले आहे.
संतप्त ग्रामस्थांनी वृक्षतोड थांबविली
By admin | Published: May 24, 2016 1:32 AM