शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

अंकिसाच्या मिरचीचा तेलंगणात ठसका; अंतर कमी अन् दरही मिळतोय जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 5:26 PM

उत्पादक वळले नागपूरऐवजी तेलंगणाकडे

महेश अगुला

अंकिसा (गडचिरोली) : सिरोंचा पासून नागपूरचे अंतर अधिक व मिरचीला दरही कमी, त्याऐवजी तेलंगणातील वरंगलचे अंतर कमी अन् भावही जास्त, त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील मिरची विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात परराज्यात जाऊ लागली आहे. सिरोंचा तालुक्यातील अंकिसा सारख्या छोट्या गावातील मिरचीला तेलंगणात पसंती मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसे पडू लागले आहेत.

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा ,असरअल्ली, बालमुत्यमपल्ली, टेकडा मोटला, वडदम, पोचमपल्ली ही मिरची उत्पादनासाठी परिचित असलेली गावे. धानाचा हंगाम संपल्यावर मिरची लागवड करुन जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांत स्पर्धा लागते. मोठ्या कष्टाने शेतकरी मिरची उत्पादन घेत असतात.

सिरोंचापासून नागपूर साडेतीनशे पेक्षा अधिक किलोमीटर अंतर आहे. त्याऐवजी तेलंगणातील वरंगल हे अवघ्या सव्वाशे किलोमीटरवर आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी नागपूरला मिरची विक्री केली, यंदा मात्र नागपूरला कमी दर मिळत असून वाहतूक खर्चही आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती तेलंगणाला आहे.

अवकाळीचा फटका

मिरची उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. तोडणी करुन वाळविण्यासाठी शेतात टाकलेली मिरची अवकाळी पावसाने भिजली. त्यामुळे आता दर कमी मिळेल, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यामुळे वरंगलच्या बाजारात आठ दिवसांपासून मिरचीच्या दरात चढ- उतार होत असल्याचे उत्पादक राजेश लंगारी, मनोज राल्लबंडी, नागेश जेयाडी, नरेश कोठारी, सतीश धन्नुरी, रवी कोठारी, नारायण येरकरी, मनोज राल्लबंडी यांनी सांगितले.

वरंगलच्या बाजारातील दर

मिरची वाण - दर (क्विंटलमध्ये)

३४१ - २१००० ते २५०००

डी. डी. - २४०००ते २६८०००

डब्ल्यू. एच . - ३४००० ते ३७६००

दीपिका - २९०००ते ३३०००

भाड्याने जमिनी घेऊन मिरची उत्पादन

सिरोंचा तालुक्यात अनेक शेतकरी भूमिहीन आहेत. असे लोक भाड्याने जमिनी घेऊन मिरचीचे उत्पादन घेतात. बोअरवेल हा या भागात एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. पाण्याची सोय असलेली एक एकर जमीन ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रुपयांनी भाड्याने घेतात, तर पाण्याची सोय नसेल तर एकरी ४० हजार रुपये भाडे मोजावे लागते

मिरची उत्पादनासाठी शाश्वत पाणी नाही. त्यासाठी तलाव होणे गरचेजे आहे. शिवाय उत्पादकांना प्रोत्साहन म्हणून कृषी विभागाने मिरचीची रोपे किंवा बियाणे द्यावीत. यामुळे शेतकऱ्यांना हातभार लागू शकतो. नागपूरचे अंतर जास्त असल्याने यंदा तेलंगणात मिरची विक्रीकडे कल आहे.

- धर्मय्या कोठारी, मिरची उत्पादक

सिरोंचा तालुक्यात मिरचीचे उत्पादन अधिक होते, पण हक्काची बाजारपेठ नाही. ही सुविधा तालुक्यात उपलब्ध झाली तर आणखी फायदा होऊ शकतो. उत्पादकांना अनेक नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे शासनाने अनुदान देखील सुरु करणे गरजेचे बनले आहे.

- रवी बोरे, मिरची उत्पादक

टॅग्स :agricultureशेतीGadchiroliगडचिरोली