गडचिराेली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार, कार्यालयीन अधीक्षक एम. एन. कन्नाके, अग्निशमनचे पर्यवेक्षक अनिल गाेवर्धन, बंडू ताकसांडे, गणेश नाईक, गणेश ठाकरे उपस्थित हाेते. रवींद्र भंडारवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमाेर दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी अभिवादन केले. सावित्रीबाईंनी समाज व्यवस्थेतील प्रचलित रूढी, परंपरा झुगारून महिलांसाठी शिक्षणाचे दालन खुले केले. देश त्यांचा सदैव ऋणी राहील, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
जिल्हा काॅंग्रेस कमिटी कार्यालय
गडचिराेली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी काेषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, नगरसेवक सतीश विधाते, रजनीकांत माेटघरे, रमेश चाैधरी, नंदू वाईलकर, काशिनाथ भडके, ओबीसी सेलचे पांडुरंग घाेटेकर, डी. डी. साेनटक्के, लहुकुमार रामटेके, शंकर डाेंगरे, संजय चन्ने, अरुण भादेकर, जितेंद्र मुनघाटे, अर्पणा खेवले, हेमंत भांडेकर, चंद्रकांत मडावी उपस्थित हाेते.
जिल्हा परिषद
गडचिराेली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) फरेंद्र कुतीरकर हाेते. याप्रसंगी जिल्हा समन्वयक एल. चाैधरी, नीता बानाेत, रंजना माेहुर्ले, के. एस. सुरपाम, राजेश कंगाले, संताेष कस्तुरे, रवी गेडाम उपस्थित हाेते. संचालन कनिष्ठ प्रशासन अधिकारी नरेश कनाेजिया यांनी केले.
गडचिराेली : रूरल ॲंड अर्बन डेव्हलपमेंट युथ असाेसिएशनद्वारा संचालित सखी वनस्टाॅप सेंटरच्या कार्यालयात क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव के. डी. देवगडे हाेते. यावेळी पायल नेवारे यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचालन ए. डी. कुनघाडकर, तर आभार एन. ए. पठाण यांनी मानले. यशस्वीतेसाठी व्ही. दातार, सुनंदा किरंगे, निराशा डाेंगरे , एम. सी. वासनिक, के. जे. मैदुरकर, वाय. एन. रामटेके यांनी सहकार्य केले.
विश्वशांती विद्यालय,
भेंडाळा : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शिक्षिका आशा भागेवाड हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक दिलीप डांगे, मार्गदर्शक म्हणून मधुकर जाधव उपस्थित हाेते. यावेळी मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. संचालन गाेकुळ झाडे, तर आभार सुधीर जिवताेडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अरुण चाैधरी, धमेंद्र दुधे, अशाेक काेहळे, वसंत सुरपाम, धनंजय गाडेवार व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा अडपल्ली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष भावना बाबनवाडे, सदस्य वर्षा भोयर उपस्थित होत्या. याप्रसंगी मागील वर्षीच्या इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थिनींचा पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये सुषमा प्रभाकर वाघाडे, छाया रमेश म्हशाखेत्री, अंकिशा गोपी चौधरी, मृणाली भगवान गेडाम यांचा समावेश हाेता. कार्यक्रमाचे संचालन कैलाश कोरोटे यांनी केले.