लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी जिल्हा घोषित करावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा निर्मिती झाली. मात्र गडचिरोली जिल्हा विस्ताराने फार मोठा आहे. सिरोंचा, भामरागड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नागरिकांना गडचिरोली जिल्हा मुख्यालयी पोहोचणे अशक्य होते. अहेरी उपविभागातील तालुक्यांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. ग्रामीण व दुर्गम भाग अजूनही विकासाच्या प्रतीक्षेतच आहे. अहेरी जिल्ह्याची निर्मिती करून नवीन तालुके सुद्धा निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास विकासाला चालना मिळेल, सूरजागड येथे लोहप्रकल्प, देवलमरी सिमेंट प्रकल्प स्थापन होऊ शकतो. तर आलापल्ली येथे कागद कारखाना तयार करण्यास मोठा वाव आहे. कमलापूर तलाव, जितम, पातानिल, त्रिवेणी संगम, व्यंकटापूर, लख्खामेंढा, बिनागुंडा ही ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून विकसित करता येतील. बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. एकंदरीतच अहेरी जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. त्यामुळे जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, रवींद्र भांदककर, श्रीनिवास भंडारी, नागसेन मेश्राम उपस्थित होते.
अहेरी जिल्हा घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:51 PM
अहेरी जिल्हा घोषित करावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा निर्मिती झाली.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन : दुर्गम व ग्रामीण भागाचा विकास रखडला