या कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी आणि नागरी कृती शाखेचे एपीआय महादेव शेलार आदींनी परिश्रम घेतले.
(बॉक्स)
व्यावसायिक प्रशिक्षणातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाइल, सुरक्षा रक्षक व नर्सिंग असिस्टंट म्हणून आजपर्यंत १६६९ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासोबतच ब्युटीपार्लर ३५, मत्स्यपालन २५, कुक्कुटपालन ३, शेळीपालन ६७, शिवणकाम ३५, अशा १९७ बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
(बॉक्स)
कुटुंबीयांचे राहणीमान उंचवावे
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक गोयल यांनी जिल्ह्यातील बेरोजगार युवक- युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर असून, तुमच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली. तुमचे मित्र, आप्तस्वकीय यांनादेखील रोजगाराबाबत माहिती देऊन पोलीस दलाने दिलेल्या या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन त्यांनी केले.