जिल्हयातील आतापर्यंत बाधित २७,१०२ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २३६२४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण ६१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. १२ नवीन मृत्यूमध्ये वडसा तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील ५० वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, ४८ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, कुरखेडा तालुक्यातील ५६ वर्षीय महिला, चामोर्शी तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, मूलचेरा तालुक्यातील ४० वर्षीय महिला, आरमोरी तालुक्यातील ६० वर्षीय महिला, ६२ वर्षीय पुरुष, कुरखेडा येथील ६८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. सक्रिय रूग्णांचे प्रमाण १०.५६ टक्के तर मृत्यूदर २.२७ टक्के झाला आहे.
नवीन २७६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ७५, अहेरी तालुक्यातील २९, आरमोरी ७, भामरागड तालुक्यातील ४, चामोर्शी तालुक्यातील ६५, धानोरा तालुक्यातील ६, एटापल्ली तालुक्यातील १४, कोरची तालुक्यातील ११, कुरखेडा तालुक्यातील ७, मूलचेरा तालुक्यातील १३, सिरोंचा तालुक्यातील १४ तर वडसा तालुक्यातील ३१ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ५५० रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १९१, अहेरी ४२, आरमोरी ६३, भामरागड ११, चामोर्शी ४६, धानोरा १५, एटापल्ली २४, मुलचेरा १७, सिरोंचा २१, कोरची २४, कुरखेडा ३५ तसेच देसाईगंज येथील ६१ जणांचा समावेश आहे.
(बॉक्स)
डॉक्टरांसोबत आज मुख्यमंत्र्यांचा संवाद
कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करताना सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. रविवार दि. १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मीडियावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहे. हा कार्यक्रम फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह राहणार आहे. या ऑनलाईन कार्यक्रमात डॉक्टर्सनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोरोना लढाईला अधिक बळ देण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.