लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये मंगला नावाच्या हत्तीणीने मकर संक्रांतीच्या पर्वावर (दि.१५) एका पिलास जन्म दिला. त्यामुळे या कॅम्पमधील हत्तींची संख्या १० झाली आहे. यापूर्वी येथे एकूण नऊ हत्ती होते.मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मंगला या हत्तीणीने नर पिलास जन्म दिला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बुधवारी (दि.१६) पिलाचे नामकरण मोठ्या उत्साहात केले. सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार, उपविभागीय वनाधिकारी यु.के. मानुसमारे यांनी सूचविल्यानुसार पिलाचे ‘अर्जुन’ असे नाव ठेवण्यात आले. याप्रसंगी कमलापूरचे वनपरिक्षेत्राधिकारी जी.एम.लांडगे, सरपंच रजनिता मडावी, संतोष ताटीकोंडावार, क्षेत्र सहायक बी.जी.कोसनकर, हत्ती कॅम्पमधील वनरक्षक गणेश अडगोपुलवार तसेच कॅम्पमधील इतर कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.मंगला नामक हत्तीण व तिच्या पिलाची आरोग्य तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन खेमलापुरे यांनी केली. पिलाचे वजन ७५ किलो असून त्याची प्रकृती उत्तम आहे. विशेष म्हणजे मागच्याच महिन्यात एका मादी पिलाचा जन्म या कॅम्पमध्ये झाला होता. आता नव्या हत्तीची भर पडल्यामुळे ग्रामस्थांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ठिकाणी पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:27 AM
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये मंगला नावाच्या हत्तीणीने मकर संक्रांतीच्या पर्वावर (दि.१५) एका पिलास जन्म दिला. त्यामुळे या कॅम्पमधील हत्तींची संख्या १० झाली आहे. यापूर्वी येथे एकूण नऊ हत्ती होते.
ठळक मुद्देमंगलाने दिला पिलास जन्म : वनविभागाने नाव ठेवले ‘अर्जुन’