आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कंत्राटी आरोग्य सेविकांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याशी चर्चा करून कंत्राटी आरोग्य सेविकांच्या समस्या मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जि.प. नर्सेस संघटनेच्या वतीने करण्यात आली.यावेळी संघटनेचे अध्यक्ष माया सिरसाट, सचिव ज्योती काबरे, कार्याध्यक्ष बेबी वड्डे, कोषाध्यक्ष कल्पना रामटेके, कंत्राटी नर्सेस संघटना शाखेच्या शर्मिला जनबंधू यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. कंत्राटी आरोग्य सेविकेच्या सी व डी ग्रेड असलेल्या मुलींची वार्षिक लेखी व तोंडी मुलाखत रद्द करण्यात यावी, समान काम, समान वेतन देण्यात यावे, अतिरिक्त कामाचा मोबदला देण्यात यावा, माता व बाल संगोपन रजा वाढविण्यात यावी, घरभाडे भत्ता व प्रवास भत्ता देण्यात यावा, नक्षलग्रस्त भत्ता लागू करावा आदी मागण्यांचा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात समावेश आहे.
आरोग्य सेविकांचे प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:06 AM
कंत्राटी आरोग्य सेविकांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याशी चर्चा करून कंत्राटी आरोग्य सेविकांच्या समस्या मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जि.प. नर्सेस संघटनेच्या वतीने करण्यात आली.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जि.प. नर्सेस संघटनेची मागणी