लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाºया चिचोडा येथील नागरिकांनी नक्षलविरोधी स्मारक उभारले असून नक्षल्यांना गावात पाय ठेऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे.चिचोडा गावात गट्टा पोलीस मदत केंद्राच्या वतीने ३१ आॅक्टोबर रोजी जनजागरण मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला उपस्थित नागरिकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण पोलिसांतर्फे करण्यात आले होते. जनजागरण मेळाव्यादरम्यान ग्रामस्थांनी नक्षलविरोधी स्मारक बांधले. नक्षल्यांविरोधात गावातील नागरिकांनी घोषणा दिल्या. गावात नक्षल्यांच्या प्रवेशाला बंदी घातली जाईल, असा इशारा दिला. जनजागरण मेळाव्यादरम्यान पोलिसांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. चिचोडा गावातील समस्या जाणून घेतल्या.या समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग इतर विभागांकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन गट्टा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी जे.व्ही. मोरे यांनी केले.चिचोडातील दोघांची नक्षल्यांकडून हत्यापोलिसांचे खबºया असल्याच्या संशावरून चिचोडा गावातील दोन नागरिकांची नक्षल्यांनी हत्या केली आहे. त्यामुळे नक्षल्यांविरोधात गावातील नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. अनेक नागरिकांनी मेळाव्यादरम्यान प्रतिक्रिया व्यक्त करताना नक्षल्यांमुळेच दुर्गम भागातील गाव व नागरिकांचा विकास रखडला असल्याची टीका केली. त्यामुळे नक्षल्यांना गावात प्रवेशास प्रतिबंध घालण्याचा निर्धार केला. गावातील नागरिकांच्या या धैेर्याचे पोेलीस अधिकारी व जवानांनी कौतुक केले.
चिचोडावासीयांनी बांधले नक्षलविरोधी स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 10:24 PM
धानोरा तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाºया चिचोडा येथील नागरिकांनी नक्षलविरोधी स्मारक उभारले असून नक्षल्यांना गावात पाय ठेऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे.
ठळक मुद्देनक्षल्यांविरोधात दिल्या घोषणा : गावात प्रवेशास प्रतिबंध घालण्याचा निर्धार