शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

नक्षलविरोधी शांतता रॅली

By admin | Published: July 29, 2014 11:47 PM

नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली पोलीस स्टेशनच्यावतीने शहरातील मुख्य मार्गावर नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली.

नागरिकांची उपस्थिती : नक्षल्यांच्या हिंसक घटनेचा केला निषेधएटापल्ली : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली पोलीस स्टेशनच्यावतीने शहरातील मुख्य मार्गावर नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली.नक्षल्यांनी २८ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन ठिकठिकाणी बॅनर लावून तसेच पत्रक टाकून केले आहेत. नक्षल सप्ताहादरम्यान नागरिकांनी कामे बंद ठेवावीत, असेही नक्षल्यांनी पत्रकातून आवाहन केले आहे. नक्षल्यांच्या दहशतीला बळी न पडता नागरिकांनी आपली दैनंदिन कामे सुरळीत पार पाडावी. यासाठी एटापल्ली पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातून नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरूवात पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. शहराच्या मुख्य मार्गाने रॅली काढून परत रॅलीचा समारोप पोलीस ठाण्यात करण्यात आला. या रॅलीदरम्यान नक्षलहिंसक घटनेचा निषेध करून शांततेचा संदेश देण्यात आला. या रॅलीत एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे, पोलीस निरिक्षक किरण अवचार, पोलीस उपनिरिक्षक आव्हाड आदीसह पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीदम्यान पोलीस विभागाच्यावतीने फलक तयार करून जनजागृती करण्यात आली. नक्षल सप्ताह पाळू नये, असे आवाहन पोलिसांनी या रॅलीदरम्यान केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी एटापल्ली पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच गावकऱ्यांनी सहकार्य केले. या रॅलीला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. (तालुका प्रतिनिधी)