लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : कुरखेडा मार्गावरील शंकरपूर ते कसारी दरम्यान वाघ दिसून आल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने कसारी फाट्यावर बॅनर लावला असून यात वाघापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.सोमवारी रात्रीच्या सुमारास देसाईगंज ते कुरखेडा मार्गावरील डोंगरमेंढा फाट्याजवळ रस्ता पार करताना वाघ आढळून आला. वाहनधारकांनी त्याचे फोटो काढून ते समाजमाध्यमांवर टाकले. त्यामुळे शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, विसोरा येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. देसाईगंजपासून कुरखेडाला जाताना आठ किमी अंतरावर शंकरपूर हे गाव आहे. शंकरपासून अवघ्या एक किमी अंतरावर कुरखेडा रस्त्याला लागून तलाव आहे. येथून पुढे गेवर्धा गावापर्यंत कुरखेडा रस्त्याच्या दोन्ही बाजुला घनदाट जंगल आहे. या जंगलाचा आधार घेत वाघाने आपला ठिय्या मांडला आहे.वन विभागाने कसारी फाट्यावरील झाडांना बॅनर लावले असून पट्टेदार वाघापासून सावधान राहावे, असे आवाहन केले आहे. याचा अर्थ या भागात वाघ असल्याचे स्पष्ट होत आहे.
वाघापासून सतर्क राहण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:13 AM
कुरखेडा मार्गावरील शंकरपूर ते कसारी दरम्यान वाघ दिसून आल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने कसारी फाट्यावर बॅनर लावला असून यात वाघापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ठळक मुद्देवन विभागाची दखल : विसोरा परिसरात लावले बॅनर