लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदानावर सुक्ष्म सिंचनाचे साहित्य उपलब्ध करून दिली जातात. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. २० फेब्रुवारीपर्यंत ६६७ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. शासनाने अर्ज करण्याची मुदत २९ फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे.शेतीसाठी सर्वाधिक भूजलसाठ्याचा उपसा होते. त्यामुळे भूजलसाठा कमी होत चालला आहे. सुक्ष्म सिंचनाची साधने वापरल्यास कमी पाण्यामध्ये अधिकाधिक पीक घेणे शक्य होते. मात्र सुक्ष्म सिंचनाची साधने शेतकरी खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शासनाने ८० टक्के अनुदानावर सुक्ष्म सिंचनाची साधने उपलब्ध करण्याची योजना आखली आहे. यासाठी राज्यस्तरावर ८०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सिंचन विहिरींची संख्या अधिक आहे. तसेच शेतकरी रबी व उन्हाळी हंगामातही विविध पिके घेण्याकडे वळत चालला आहे. अशा शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनाच्या साहित्याची गरज आहे. जिल्ह्यातील ६६७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. अपेक्षेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले आहेत.योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या नावाने सातबारा असावा. तसेच संबंधित शेतकऱ्याकडे विहिर किंवा शेततळे असल्याची नोंद सातबाऱ्यावर असावी. तशी नोंद सातारावर नसल्यास शेतकऱ्यांनी स्वयंघोषणापत्र द्यायचे आहे. बंधारा, कॅनल असल्यास संबंधित अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांकडून घेणे आवश्यक आहे. सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास संबंधितांचे करारपत्र घ्यावे. विद्युत पंपाकरिता कायम स्वरूपी वीज जोडणी असावी. सोलर पंप असल्यास सोलर पंपाची कागदपत्रे प्रस्तावासोबत असावीत. शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या आधारसंलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा केली जाईल.ऑनलाईन अर्जसुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्वीकारले जातील. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून त्याच्या पसंतींचा सुक्ष्म सिंचनाचा संच खरेदी करायचा आहे. संबंधित बिल व अनुदान मागणीचा प्रस्ताव आवश्यक अभिलेखांच्या प्रतीसह ऑनलाईन प्रणालीद्वारेच सादर करायचा आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.कमी पाण्यात अधिक क्षेत्रावर पीके घेण्यासाठी सुक्ष्म सिंचन हा सर्वोत्तम पर्याय आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदानावर सुक्ष्म सिंचनाची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.- प्रिती हिरळकर, उपविभागाीय कृषी अधिकारी, गडचिरोली
सिंचन योजनेसाठी ६६७ शेतकऱ्यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 6:00 AM
शेतीसाठी सर्वाधिक भूजलसाठ्याचा उपसा होते. त्यामुळे भूजलसाठा कमी होत चालला आहे. सुक्ष्म सिंचनाची साधने वापरल्यास कमी पाण्यामध्ये अधिकाधिक पीक घेणे शक्य होते. मात्र सुक्ष्म सिंचनाची साधने शेतकरी खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शासनाने ८० टक्के अनुदानावर सुक्ष्म सिंचनाची साधने उपलब्ध करण्याची योजना आखली आहे. यासाठी राज्यस्तरावर ८०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सिंचन विहिरींची संख्या अधिक आहे.
ठळक मुद्दे२९ पर्यंत मुदतवाढ : ८० टक्के अनुदानाचा लाभ