शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

२६ ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 10:35 PM

येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे१४ आॅक्टोबरला मतदान : युवा उमेदवारांसाठी सातवी पासची अट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. १६ आॅक्टोबरला निकाल जाहीर होऊन नागरिकांनी निवडलेले सरपंचही जाहीर होतील. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांना लागली आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.यावेळी प्रथमच नागरिकांमधून सरपंचाची थेट निवड होणार आहे. त्यामुळे बहुमत कोणत्या गटाला मिळते यापेक्षा सरपंच कोणाचा होतो यावर राजकीय पक्ष आपले लक्ष केंद्रीत करणआर आहे. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नसली तरी सर्व प्रमुख पक्ष आपल्याच गटाचा किंवा पक्षाचा सरपंच व्हावा यासाठी जोमाने निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.वर्ष २०११ च्या जनगणनेचा आधार घेऊन नव्याने प्रभागरचना आणि आरक्षण करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०१७ पर्यंतच्या मूळ मतदार यादीनंतर जुलै महिन्यात नोंदणी झालेल्या नवीन मतदारांचा समावेश करून सुधारित मतदार यादी तयार करण्यात आली आहे.जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील किष्टापूर ग्रामपंचायतीचा कार्यक्रम आधीच जाहीर करण्यात आला आहे. आदिवासीबहुल जिल्हा असल्यामुळे बहुतांश जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. परंतू जात पडताळणी करण्याबाबत जागृतीच नसल्यामुळे लोक निवडणुकीत उभे राहण्यापासून वंचित राहतात. त्यासाठी शासन स्तरावर चर्चा करून जिल्ह्यात जात पडताळणी समितीचे विशेष शिबिर लावण्याची मागणी जोर धरत आहे.निवडणूक प्रक्रियेला नक्षलवाद्यांचा विरोध असला तरी अलिकडे हा विरोध काहीसा सौम्य झाला आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी अतिसंवेदनशिल भागातील नागरिक ही पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र त्या भागात निवडणूक यंत्रणेने योग्य प्रकारे जनजागृती करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.अवघ्या ४ ग्रा.पं.साठी दुसरा टप्पाराज्यभरात आॅक्टोबर ते फेब्रुवारी यादरम्यान मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यात होत आहे. निवडणूक यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून पहिल्या टप्प्यात डिसेंबरपर्यंत मुदत संपणाºया ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात फेब्रुवारीपर्यंत केवळ ३१ ग्रा.पं.च्या निवडणूक लागणार आहे. या सर्व ठिकाणची निवडणूक एकाच टप्प्यात घेणे सहज शक्य होते. परंतू तसे न करता केवळ ४ ग्रामपंचायतींची निवडणूक दुसºया टप्प्यात होणार असल्यामुळे प्रशासकीय खर्च वाढणार आहे.रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीला खो२७ मे २०१७ रोजी झालेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत ४३७ जागांवर कोणीच उमेदवार निवडणूक लढण्यासाठी पुढे आले नव्हते. त्या ठिकाणी तीन महिन्यानंतर पुन्हा निवडणूक कार्यक्रम लावता येतो. परंतू शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमात रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीला ‘खो’ देण्यात आला आहे. त्यामुळे गावांच्या विकासाचा पाया असणाºया ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांचे प्रशासन किंवा निवडणूक आयोगाला गांभिर्य नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशी असेल पात्रतासदर निवडणूक लढवू इच्छिणारा उमेदवार जर १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेला असेल तर तो किमान सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.ज्या ग्रामपंचायतमध्ये उमेदवार निवडणूक लढणार आहे त्या गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असणे गरजेचे आहे.इच्छुक उमेदवाराने वयाचे २१ वर्षे पूर्ण केलेले असावे.१२ सप्टेंबर २००१ नंतर २ पेक्षा अधिक अपत्यांचा जन्म झाला असल्यास ते उमेदवार अपात्र ठरणार आहेत.उमेदवाला जात आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. नसल्यास त्यासाठी अर्ज केलेला असावा.इच्छुक उमेदवाराच्या घरी शौचालय असणे आवश्यक आहे.