शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

दुचाकीचा आरसा तोडल्याचा वाद, खुनाच्या प्रयत्नात तरुणास जन्मठेप

By संजय तिपाले | Published: July 04, 2024 9:16 PM

मानापूर येथील घटना : जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश.

संजय तिपाले, गडचिरोली : पाहुण्याच्या दुचाकीचे दोन्ही आरसे तोडल्यावरुन झालेल्या वादानंतर एकाने काठीने हल्ला करुन खून करण्याचा प्रयत्न केला. वर्षभरापूर्वी आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे घडलेल्या या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवून न्यायालयाने ४ जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्या. विकास कुलकर्णी यांनी हे आदेश दिले.

आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे २५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडेसात वाजता विजय भानुजी ढवळे (४८)हे गावातील एका पानटपरीसमोर बसलेले होते. यावेळी गावातील अमोल उध्दव साखरे (३४) याने काठीने डोक्यावर मारहाण केली. यात विजय हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी २६ एप्रिल २०२३ रोजी विजय यांचा पुतण्या चेतन प्रकाश ढवळे याच्या फिर्यादीवरुन अमोल साखरेविरुध्द आरमोरी ठाण्यात भादंवि ३०७ अन्वये गुन्हा नोंद झाला होता.

दरम्यान, जखमी विजय हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून होते, गावातील नातेवाईकांनी त्यांना देलनवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तेथून जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात असतांना जखमीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना नंतर नागपूर येथे खाजगी रुग्णालयात हलविले. दरम्यानख जखमी विजय ढवळे यांचा २० जून २०२३ रोजी जबाब नोंदविण्यात आला. त्यात त्यांनी घटनेच्या एक वर्षाआधी पुतण्या चेतन ढवळे याच्या घरी पाहुणे आले असता त्यांच्या दुचाकीचे दोन्ही आरसे अमोल साखरे याने तोडून नुकसान केले होते. तेव्हा अमोल साखरे सोबत वाद झाले होते. या कारणावरुन अमोल साखरे याने काठीने जीवघेणा हल्ला केल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले होते.

तत्कालीन पो.नि. संदीप मंडलिक यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गडचिरोली विकास कुलकर्णी यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी सहाय्य केले.दोन महिन्यानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

विजय ढवळे यांच्या डोक्याला हल्ल्यात तीन गंभीर दुखापती झाल्या होत्या. दोन महिने ते कोमात होते. मृत्यूच्या दाढेतून ते सुदैवाने सुरक्षित बाहेर आले. वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्षदर्शींचे जबाब ग्राह्य धरुन तसेच जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.जिल्ह्यात खुनाच्या प्रयत्नात जन्मठेपेची पहिलीच शिक्षा

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा मानला जातो. यात बहुतांश प्रकरणात दहा वर्षांपर्यंत शिक्षा व द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली जाते. मानापूर येथील प्रकरणात आरोपीला जन्मठेप सुनावण्यात आली. खुनाच्या प्रयत्नात जन्मठेपेची शिक्षा होण्याचे हे जिल्ह्यातील पहिलेच प्रकरण असल्याचा दावा जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी