आशांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या आशांचा गाैरव करण्यात आला. आराेग्य सेवा व शासकीय याेजना घरापर्यंत पाेहाेचविण्याचे काम आशा करतात. त्यांचे काेराेना काळातील काम प्रशंसनीय आहे, असे उद्गार चेतन हिवंज यांनी काढले. याप्रसंगी सर्व आशांची आराेग्य तपासणी करण्यात आली. यशस्वीतेसाठी तालुका समूह संघटक अश्विनी डाेईजड यांच्यासह गटप्रवर्तक व आशांनी सहकार्य केले.
काेरची येथे तालुका आराेग्य अधिकारी कार्यालातर्फे आशा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. विनाेद मडावी हाेते. प्रमुख अतिथी म्हणून काेटगूलचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. हरीश टेकाम, डाॅ. प्रणव लेपसे, डाॅ. शुभम वयाड, डाॅ. दादाजी नखाते उपस्थित हाेते. ग्रामीण भागात नागरिक व आराेग्य सेवा यातील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका आशा पार पाडतात, असे उद्गार डाॅ. विनाेद मडावी यांनी काढले. याप्रसंगी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तिपत्र व बक्षीस देण्यात आले. तसेच बाेटेकसा व काेटगूल पीएचसीतील आशांची आराेग्य तपासणी करण्यात आली. यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक एच. एस. साेरते, प्रमाेद सातपुते, तालुका समूह संघटक बबन बन्साेड व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
फाेटाेे.....
आरमाेरी येथे कार्यक्रमाला उपस्थित आशा स्वयंसेवक.