शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

पट्टेदार वाघाच्या दहशतीने पुन्हा हादरला आरमोरी तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:41 AM

तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी आरमोरीजवळील रामपूर चक जवळील जंगलात पट्टेदार वाघाने गायीच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. शिकारीनंतर गायीवर ताव मारण्यासाठी दुसरीकडे घेऊन जातानाचे क्षण वनविभागाने लावलेल्या कॅमेरात ट्रॅप झाले आहेत.

ठळक मुद्देगुरांच्या कळपावरील हल्ल्यात गाय ठार : वन विभागाने लावलेल्या कॅमेरात ट्रॅप झाली वाघाने केलेली शिकार, बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी आरमोरीजवळील रामपूर चक जवळील जंगलात पट्टेदार वाघाने गायीच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. शिकारीनंतर गायीवर ताव मारण्यासाठी दुसरीकडे घेऊन जातानाचे क्षण वनविभागाने लावलेल्या कॅमेरात ट्रॅप झाले आहेत. सदर छायाचित्र बघून वाघाच्या दहशतीचा अंदाज येतो.दीड वर्षांपूर्वी आरमोरीपासून जवळच असलेल्या रवी व कोंढाळा या दोन गावातील प्रत्येकी एका व्यक्तीला ठार केले होते. त्यानंतर वाघाच्या जोडीने उन्हाळ्यात याच ठिकाणी जवळपास महिनाभर बस्तान मांडून जवळपासच्या प्राण्यांवर हल्ला केला होता. पावसाळ्यात या परिसरातून वाघ निघून गेल्याने दहशत कमी झाली होती. त्यानंतर पुन्हा आता मागील चार महिन्यांपासून वाघाने दहशत निर्माण केली आहे. १५ दिवसांपूर्वी चुरमुरा येथील एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. तसेच वडधा, देलोडा परिसरातही वाघाने जनावरांना ठार केले आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे दहशतीत आहेत.मंगळवारी २७ नोव्हेंबर रोजी रामपूर चक येथील जनावरांचा कळप जंगलात चरण्यासाठी गेला असता, वाघाने दुपारी १२ वाजताच्या सुमारास कळपावर हल्ला केला. यात एक गाय ठार झाली. सदर गाय धनराज ठाकरे यांच्या मालकीची होती. गुराख्याने आरडाओरड केल्यानंतर गायीला ठार करून वाघ पळून गेला. याबाबतची माहिती लगेच वन विभागाला देण्यात आली. आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांच्या मार्गदशनात क्षेत्र सहायक रमेश गोटेफोडे, वनरक्षक सुखदेव दोनाडकर यांनी घटनास्थळी जाऊन तत्काळ जाऊन पंचनामा केला.दरम्यान गायीला ज्या ठिकाणी वाघाने मारले होते त्या ठिकाणी पुन्हा वाघ येईल म्हणून वन विभागाने घटनास्थळी ट्रॅपिंग कॅमेरा लावला. सायंकाळी ५ वाजता सदर वाघ पुन्हा गायीला खाण्यासाठी शिकारीच्या ठिकाणी आल्यामुळे तो कॅमेरात ट्रॅप झाला आहे. या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी, गुराख्यांनी वनविभागाकडे केली आहे.

टॅग्स :Tigerवाघ