दोन दिवसांपूर्वी कोटगल येथील एका विक्रेत्याच्या घरातून सुगंधित तंबाखू (मजा) आणि तंबाखू विक्रीतून आलेले रोख २ लाख रुपये गडचिरोली पोलिसांनी हस्तगत केले. त्या ठिकाणी तंबाखूचा साठा जास्त असताना प्रत्यक्षात केवळ २७ हजारांचा तंबाखू दाखविल्याचे बोलले जाते. त्या कारवाईचा पुढील सखोल तपास करण्यात पोलिसांनी स्वारस्य दाखविलेले नाही, हे विशेष.
(बॉक्स)
बाजारवाडी जवळ मुख्य केंद्र
गडचिरोली शहरातील मूल मार्गावर असलेल्या बाजारवाडीजवळ शहरातील सुगंधित तंबाखू विक्रीचे मुख्य केंद्र आहे. मात्र, आतापर्यंत त्या ठिकाणी कोणीच तंबाखूचा साठा जप्त करण्याची कारवाई केली नाही. गेल्या काही दिवसांत दारू विक्रेत्यांवर कारवाई करणारे एसडीपीओ प्रणिल गिल्डा आणि नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम हे चंद्रपुरातून येत असलेल्या तंबाखू तस्करीला आळा घालतील का, असा प्रश्न गडचिरोलीकरांकडून केला जात आहे.